News Today
वणी :- नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जोरदार राजकीय वैतागळ सुरू असून प्रभाग क्रमांक ७ चे राजेश बापुराव पारधी, प्रभाग क्रमांक ८ चे नाना उर्फ प्रशांत विठ्ठलराव कापसे, प्रभाग क्रमांक १ चे प्रशांत सुदाम फाळके यांच्यासह प्रभाग क्रमांक १३ मधून संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जाणारे संतोष जोगी यांनीही पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीत अक्षरशः मोठी इंकामिंग होत असल्याचे चित्र आहे.

वणी विधानसभा क्षेत्राध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आणि संघटनातील सातत्यपूर्ण कामामुळे पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षकांचे म्हणणे आहे.
पक्ष प्रवेश सोहळ्यास प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष आबिद हुसेन, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अरबाज पठाण, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तसेच प्रदीप खोब्रागडे, नरेंद्र लोणारे , खुशाल बासमवार यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
तिन्ही प्रभागांतील बलाढ्य तिकडीबरोबरच प्रभाग १३ मधील संभाव्य उमेदवार संतोष जोगी यांचा वाढता प्रभावही लक्षवेधी आहे. या चौघांच्या उमेदवारीमुळे स्थानिक राजकारणातील समीकरणे मोठ्या प्रमाणात ढवळून निघाली असून अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या आता चौफेर—प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत नव्या आत्मविश्वासाने उतरला आहे. आगामी निवडणुकीत या बदलांचा थेट परिणाम दिसून येईल, असा ठाम अंदाज व्यक्त केला जात आहे.



