News Today
वणी प्रतिनिधी – कार्तिकेय कोल वाशरीज प्रा. लि., कळमना (खुर्द) येथील कामगारांचे आमरण उपोषण आज सहाव्या दिवशी धगधगत असून, उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर होत चालली आहे. मागण्या मान्य न झाल्यास परिस्थिती चिघळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

कामगारांची ठाम भूमिका –
रोटेशन पद्धतीने १८ दिवसांचे वेतन व काम हमखास द्यावे.
थकीत रक्कम तात्काळ अदा करावी व प्रत्येक कामगाराला ‘वन टाइम सेटलमेंट’ म्हणून १० लाख रुपये द्यावेत.
कंपनी बंद पडल्यास पुन्हा सुरू होताना जुनेच कामगार प्राधान्याने नेमावेत, याची लेखी हमी द्यावी.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून, पक्षाचे प्रदेश सचिव रज्जाक पठाण , विजय नगराळे आणि वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, तालुकाध्यक्ष प्रवीण खारकर, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे , यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कामगारांचे म्हणणे ऐकले व एकजूट व्यक्त केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे, ग्राम पंचायत सदस्य राहुल क्षिरसागर उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी उपोषणस्थळी तिरंगा फडकवला जाणार आहे. मात्र, उपोषणकर्त्यांची प्रकृती सतत खालावत असल्याने पुढील १२ तासांत शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी ठाम मागणी कामगारांनी केली आहे. अन्यथा संघर्ष उग्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.



