Monday, May 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedनाशिक कुंभमेळा टेंडर घोटाळा? वायरल ऑडिओनं महाराष्ट्रात खळबळ, कारवाईत दुजाभावाचा आरोप, 

नाशिक कुंभमेळा टेंडर घोटाळा? वायरल ऑडिओनं महाराष्ट्रात खळबळ, कारवाईत दुजाभावाचा आरोप, 

ऑडिओ क्लिपवरून बच्चू कडू यांचेवर गुन्हा नोंद होतो तर नाशिक कुंभमेळा टेंडर मॅनेज प्रकरणी सरकार गप्प का ?

दिलीप भोयर    (News Today )

मुंबई:- नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हजारो कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेत मोठ्या गैरव्यवहाराचे आरोप समोर येत असून, एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या वायरल ऑडिओमध्ये मंत्र्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ‘सेटिंग’ झाल्याचा दावा करण्यात आला असून, संपूर्ण प्रक्रिया मॅनेज केल्याचे सूचित होत आहे.

केवळ ऑडिओ क्लिअर बच्चू कडू यांचेवर गुन्हा नोंद होऊ शकतो तर मग नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी हजारो कोटीचे टेंडर मॅनेज होत असल्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. मग या घटनेवर सरकार गप्प का ? असा सवाल जनतेत निर्माण झाला आहे.

एका प्रकरणात लाचखोरीत अटक असलेल्या मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड यांचा उल्लेख होत असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. जर या क्लिपमधील दावे सत्य ठरले, तर हा प्रकार केवळ भ्रष्टाचार नसून सरकारी तिजोरीवर टाकलेला मोठा डाका असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात आमदाराच्या भावाला मारण्याच्या कट केल्याच्या आरोपावरून कथित ऑडिओ क्लिप वायरल होताच त्यांच्यावर तातडीने गुन्हा नोंद करण्यात आला. कडू हे अचलपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार असून, ते शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर सातत्याने सरकारला धारेवर धरत असतात.

यामुळेच काही राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगू लागली आहे की, सरकारमधील काही जातीयवादी मंत्र्यांच्या ‘हिटलिस्ट’वर असल्यामुळे बच्चू कडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली का? एका बाजूला तात्काळ गुन्हा नोंद होतो, तर दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्यासारख्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

धर्माच्या नावाखाली पवित्र मानल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यासारख्या सोहळ्यात जर भ्रष्टाचार होत असेल, तर हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे शासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सामान्य जनतेचा विश्वास ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे.

बघा हजारो कोटींचे टेंडर मॅनेज झाल्याची वायरल व्हिडिओ क्लिप

https://www.facebook.com/share/v/1FgBFJzGgF/

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter