Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedवणीतील श्यामा (मिस्त्री) संगमवार यांचे अल्पशा आजाराने निधन

वणीतील श्यामा (मिस्त्री) संगमवार यांचे अल्पशा आजाराने निधन

News Today 

वणी : वणी शहरातील लेथ मशीणवाले म्हणून परिचित श्यामा (मिस्त्री) उर्फ श्यामा नरेश संगमवार (वय ४०, रा. राजूर (क.), ता. वणी, जि. यवतमाळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

हसमुख स्वभाव, मदतीला तत्परता आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. पाच दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी वर्धा येथील सावंगी (मेघे) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाने वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे. सकाळी सुमारास वर्धाहून पार्थिव शरीर राजूर येथे पोहोचेल.कमवता व्यक्ती निघून गेल्याने परिवारावर संकट कोसळले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter