Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedवणीमध्ये हिंदू–मुस्लिम एकतेचा नवा संगम “राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी” घोषणांनी...

वणीमध्ये हिंदू–मुस्लिम एकतेचा नवा संगम “राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी” घोषणांनी दणाणले सभागृह राष्ट्रवादीच्या सौ. काजल शेख यांच्या उमेदवारीला एमआयएमचा जाहीर पाठिंबा

News Today 

वणी :- नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणाला नवा कलाटणी देणारी घटना घडली आहे. शदचंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. काजल इस्माईल शेख (राजगडकर) यांना एमआयएम पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याने वणीतील राजकीय चित्र नव्याने रंगले आहे. मुस्लिम समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“राम कृष्ण हरी… वाजवा तुतारी” या घोषणांनी हिंदू–मुस्लिम एकतेचा उत्साह सभागृहात उसळून वाहिला. ही पत्रकार परिषद स्व. नानासाहेब गोहकार सभागृहात संपन्न झाली.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव रजाक पठाण, विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर, जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अरबाज खान पठाण, जिल्हा उपाध्यक्ष समीर बेग, तालुकाध्यक्ष राजू वांढरे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र लोणारे, भारत मालेकर तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. काजल शेख व नगरसेवक उमेदवारांसह एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष असीम हुसेन, प्रवक्ते तौसिफ खान, युवा नेते रेहान खान व रेहान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या बहुतेक नगरसेवक उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असून वणीतील केवळ दोन प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. विशेषतः प्रभाग ९(ब) मध्ये राष्ट्रवादीने उमेदवार दिला नसल्याने एमआयएमच्या साकिब खान यांना पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे.

वणीतील दोन्ही समाजांत एकतेचा संदेश देणाऱ्या या पत्रकार परिषदेने राजकीय विरोधकांचे समीकरण बिघडवले आहे.


“हिंदू-मुस्लिम हातात हात घालून एकत्र आले, ही वणीच्या राजकारणातील ऐतिहासिक घडी ठरणार आहे,” अशी प्रतिक्रिया उपस्थितानी व्यक्त केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter