Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedवणीच्या ‘बोगस विकासा’चं बोलकं चित्र!प्रभाग क्रमांक 2 प्रगती नगरात खड्ड्यांचं साम्राज्य आणि...

वणीच्या ‘बोगस विकासा’चं बोलकं चित्र!प्रभाग क्रमांक 2 प्रगती नगरात खड्ड्यांचं साम्राज्य आणि फिल्टर पाण्याच्या गाड्यांचा बोलबाला… भाजपचा विकास फक्त कागदावर

News Today 

!वणी  (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक 2 प्रगती नगर परिसरातील नागरिक आज ‘विकासा’च्या नावाखालील भ्रष्टाचाराचा भोग घेत आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी उभारलेले काँक्रेटचे रस्ते काही महिन्यांतच खड्ड्यांनी विद्रूप झाले आहेत. 

लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही लोकांना चालण्यालायक रस्ते मिळाले नाहीत, हे दुर्दैवी वास्तव आज एका फोटोद्वारे उघड झाले आहे.एका बाजूला विकासाच्या नावाने टाकलेले निकृष्ट दर्जाचे काँक्रेट रस्ते कोसळत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच रस्त्यावरून खाजगी फिल्टर पाण्याच्या गाड्या फिरत आहेत.

नगरपरिषदेकडून हजारो रुपयांचा पाणीकर आकारला जातो, मात्र नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही. परिणामी लोकांना पैसे मोजून ‘कॅनचे पाणी’ खरेदी करावे लागत आहे.

निवडणुकीपूर्वी ‘विकासाचे आश्वासन’ देणाऱ्या भाजपच्या प्रतिनिधींना आता लोक विचारत आहेत – “साहेब! शिक्षण, आरोग्य, पाणी आणि प्रदूषण या प्रश्नांवर तुम्ही काय केलं?”

पण उत्तर देताना त्यांच्या ‘बॉबड्याची बोबडी उडते’ अशी जनतेची टीका आहे.जनतेच्या मूलभूत गरजांकडे पूर्ण दुर्लक्ष करून केवळ काँक्रेटच्या बोगस योजनांतून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter