*सूटबुद्धीने रचला डाव आईच्या काळजाने घेतला घाव*
News Today
दिलीप भोयर
वणी :- सत्तेचा अहंकार आणि सूडबुद्धीचा ज्वालामुखी जेव्हा फुटतो, तेव्हा निर्दोष जीव त्यात होरपळतात — आणि अशाच एका मातृहृदयाने काल तारीख १६ रोजी आपला शेवटचा श्वास घेतला. मनसे नेते राजू उंबरकर यांच्यावर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. आपल्या लेकरावर झालेल्या अन्यायाचं ओझं सहन न झाल्याने आईचं हृदय थांबलं — “राजुला जामीन मिळाला” हे शब्द ऐकताच ती कायमची शांत झाली.

सत्तेचा सूड, अन्यायाचा डोंगर
स्थानिकांच्या मते, चंद्रपुरातील सत्तेतील विद्यमान आमदार व माजी मंत्री असलेल्या एका कंत्राटदार नात लगाने खंडणीचा आरोप करीत तक्रार दाखल केली असता सत्ताधारी पक्षाच्या वणीतील एका माजी आमदाराने याच संधीचा फायदा घेत सूडबुद्धीमुळे राजू उंबरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कोणतेही ठोस पुरावे नसतानाही गंभीर गुन्हे नोंदनावासाठी आपली पत पणाला लावली होती.
राजू उंबरकर हे पंधरा दिवसांपासून भूमिगत होते; आणि त्याच काळात त्यांच्या आईची प्रकृती चिंतेने दिवसेंदिवस ढासळत चालली होती. ती म्हणायची — “माझं लेकरं निर्दोष आहे… पण सत्ताधाऱ्यांनी त्याला गुन्हेगार ठरवलं.”

न्याय मिळाला… पण आई गेली
मोठे भाऊ प्रवीण उंबरकर यांनी नागपूर खंडपीठात न्यायासाठी अर्ज दाखल केला आणि अखेर न्यायालयानं दुपारी राजू यांना जामीन मंजूर केला.
आईला ही आनंदवार्ता देण्यासाठी त्यांनी फोन लावला —
“आई, राजुला बेल मिळाली!”
पण नियतीनं क्रूर खेळी केली… तो शब्द ऐकताच आईचे हृदय थांबले. बघता बघता श्रीमती सुंदराबाई मधुकर उंबरकर यांनी जगाचा निरोप घेतला.

गावात शोक, मनात संताप
वणी आणि आसपासच्या भागात शोककळा पसरली आहे. नागरिकांत संताप आणि असहायतेचं वातावरण आहे. एका गावकऱ्याने संतापाने म्हटलं —
“सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना गुन्ह्यांच्या खोट्या साखळ्यांमध्ये अडकवून लोकशाही गळा घोटण्याचं काम सुरू केलं आहे.”
उबाठा गटालाही सत्तेचा फटका
मनसे प्रमाणेच शिवसेना (उबाठा) गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरही दबाव आणत, राज्यात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ घोषित करावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी केवळ या मागणीला घेऊन वणी शहरात सत्तापक्षातील आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके या मंत्र्याचा ताफा रोखून त्यांना काळे झेंडे दाखवल्याच्या कारणावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवल्या गेले. आणि त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. अशीच घटना राज्यातील एका जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे सोबती घडली परतू त्यांनी कोणतेही गुन्हे नोंदविले नाही. मग एकाच सत्तेतील असलेल्या मंत्र्यांचे एकच घडलेली घटना असताना कायदे वेगवेगळे कसे ? “सरकार विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखवणं ही लोकशाहीची विटंबना आहे. हा सूडबुद्धीचा खेळ थांबवायलाच हवा.” अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अशीच सूडबुद्धी आणि भ्रष्टाचाराच्या आरोप करीत सत्ता पक्षातील एका दिग्गज नेत्याने नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

“आई गेली, पण तिचं स्वप्न जिवंत आहे…”
“आई गेली, पण तिच्या डोळ्यांत न्यायाचं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अशी राजू उंबरकर यांनी प्रतिक्रिया दिली.
एका वृद्ध शेतकऱ्याने हळव्या शब्दांत म्हटलं
“लोकशाहीत सत्तेचा हा विळखा असह्य आहे. पण जनता जागृत आहे — आता अन्याय गप्प बसवू शकणार नाही.”
आजचा दिवस — मातृत्वाचं प्रतीक, पण एका लेकरासाठी शोकदिवस
आज नियतीनं आणखी एक हृदयद्रावक विरोधाभास दाखवला आहे. आज वसुबारस, म्हणजेच आई आणि लेकराच्या प्रेमाचं वंदन करणारा दिवस. या दिवशी गायी–वासराचं पूजन करून मातृत्वाचा सन्मान केला जातो. पण याच दिवशी राजू उंबरकर आपल्या आईच्या पार्थिवावर अंत्यविधी करत आहेत.
एकीकडे संपूर्ण समाज आई–मुलाच्या नात्याचं पूजन करत असताना, दुसरीकडे एका लेकरानं आपल्या आईचं पार्थिव डोळ्यांतून अश्रू ओघळवत निरोप दिला. वसुबारसच्या या मातृपूजनाच्या पवित्र दिवशी, मातृहृदय हरवलेल्या त्या लेकरासाठी हा दिवस आयुष्यभराचं दुःख बनून राहिला आहे.
आज तिच्या जाण्यानं केवळ एक आई नाही, तर मातृत्वाचं प्रतीक हरपलं आहे — आणि समाजाने हे लक्षात ठेवावं की न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येक लेकरामागे अशीच एखादी आई उभी असते, जी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलावर विश्वास ठेवते. 🌼
ही केवळ एका आईची कथा नाही — हा अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजाचा, आणि त्या आवाजाला बळ देणाऱ्या मातृशक्तीचा सन्मान आहे.





