News Today
वणी (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांची सौजन्य भेट घेऊन विविध विकासात्मक आणि सामाजिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व यवतमाळ जिल्ह्याचे निरीक्षक अफजल फारुकी, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शकील अहमद, प्रदेश संघटन सचिव रज्जाक पठाण, यवतमाळ जिल्हाध्यक्षा सौ. वर्षाताई निकम, जिल्हा उपाध्यक्ष अशोक राऊत, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक घारपडकर, पश्चिम नागपूर विधानसभा अध्यक्ष सय्यद अहमद तसेच वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर हे मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत स्थानिक जनतेच्या समस्या, विकासकामांच्या प्रगतीचा आढावा, तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्ष संघटनबांधणी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. आमदार संजय दरेकर यांनी शिष्टमंडळाचे मन:पूर्वक स्वागत करून त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधला.
या भेटीने वणीतील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून, येत्या काळात स्थानिक प्रश्नांवर समविचारातून उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली आहे.