News Today
मुंबई (प्रतिनिधी) :मागील २ ते ३ वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरावात केली असून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची अधिकृतपणे लवकरच घोषणा होण्याचा संकेत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

संभाव्य निवडणूक कार्यक्रमानुसार २१ मेपर्यंत नोटिफिकेशन जारी करण्यात येणार असून,५ जून ते २५ पर्यंत आदर्श आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. ता. २५ जुलै रोजी प्रत्यक्ष मतदान आणि २७ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. अश्या निवडणुका संपन्न होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकांचे वारे वाहतच विविध पक्षांचे हवसे आणि गवसे सज्ज झाले असून, मतदारांना भुलवण्यासाठी जनसंपर्क, जाहिरातबाजी आणि गुप्त बैठकींना सुरुवात झाली आहे. स्थानिक पातळीवरील हे निवडणुकीचे रण आता उभे राहत असून, स्थानिक विकासाच्या मुद्द्यांपासून जातीय समीकरणांपर्यंत अनेक गोष्टी या निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतील.

प्रत्येक गटात उमेदवार निश्चिती, प्रचारासाठी रणनीती, आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवकल्पनांचा मारा होणार हे स्पष्ट आहे. गावपातळीवर मतदारांमध्येही उत्सुकता वाढली असून, ‘या वेळी कोण?’ हा प्रश्न सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

राजकीय पक्षांच्या तयारीसह प्रशासनही निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी सज्ज झाले असून, आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यात येणार आहे. वरील माहिती ही केवळ संभाव्य आहे. निवडणूक आयोग अधिकृत माहिती प्रकाशित केल्यानंतरच निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणार आहे.



