Monday, April 20, 2026
Google search engine
Homeवणीमोठी खळबळ:- माजी आमदार बोदकुरवारांची शेतकऱ्याला अश्लीश शिवीगाळ व धमकी;  शेताच्या सीमावादातून...

मोठी खळबळ:- माजी आमदार बोदकुरवारांची शेतकऱ्याला अश्लीश शिवीगाळ व धमकी;  शेताच्या सीमावादातून पोलिसांत तक्रार

 

News Today 

वणी :- शेताच्या सीमावादातून वणी तालुक्यातील एका शेतकऱ्याला माजी आमदाराने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्याने वणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बोदकुरवारांच्या या प्रतापामुळे भाजपची प्रतिमा मात्र मलिन होतांना दिसून येत आहे. या प्रकरणी उचित चौकशीची गरज निर्माण झाली आहे.

मारोती दादाजी खुसपुरे (वय ५४) असे तक्रारदार शेतकऱ्याचे नाव असून ते ओम नगर, चिखलगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या शेतालगतच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे शेत आहे. दिनांक १४ मे २०२५ रोजी सकाळपासून खुसपुरे आपल्या शेताच्या सीमारेषेवर सिमेंटचे खांब लावून कंपाऊंड करत होते. सायंकाळी सुमारे ६ वाजता माजी आमदार बोदकुरवार हे आपल्या वाहनासह घटनास्थळी आले.

तक्रारीनुसार, त्यांनी खुसपुरे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत, “तुझ्या शेताची सीमा इथून येत नाही, मी माजी आमदार आहे, सरकार आमचं आहे,” अशी धमकी देत खांब उखडून फेकून दिले. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या वाहनचालकानेही खुसपुरे यांना धक्का दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

खुसपुरे यांनी दिलेल्या तक्रारीत, या घटनेमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवितास धोका असून, माजी आमदार असल्याने राजकीय दबाव टाकून त्रास दिला जाऊ शकतो, असे नमूद केले आहे. या प्रकरणाची दखल वणी पोलीसनी घेतली नसून कारवाईस दिरंगाई केल्या जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत आहे.

माजी आमदार बोदकुरवार यांनी शेतकऱ्यांविषयी केलेली अश्लील आणि अवमानकारक भाषा केवळ दुःखदच नाही, तर ती अत्यंत निंदनीय आहे. शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे, आणि त्यांच्याविषयी अपशब्द वापरणं म्हणजे संपूर्ण शेतकरी समाजाचा अपमान करण्यासारखं आहे.

लोकप्रतिनिधी पद भूषवलेली व्यक्ती जर अशा प्रकारे वागते, तर ती लोकशाही मूल्यांचाही अपमान करते. आम्ही अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध करतो आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, ही आमची मागणी आहे.

शेतकऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, कारण अन्नदाता अपमानित होणार असेल तर संपूर्ण समाजाचं भविष्य अंधारात जाईल. अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांनी व्यक्त केली.

संजय निखाडे जिल्हाप्रमुख शिवसेना (उबाठा)

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter