Wednesday, April 23, 2025
Google search engine
Homeवणीचोर सोडून संन्याशाला मार, वणी पोलिसांचा ऊर्फाटा कारभार, विनाकारण शेतकरयाला मारहाण, सरपंच हितेश...

चोर सोडून संन्याशाला मार, वणी पोलिसांचा ऊर्फाटा कारभार, विनाकारण शेतकरयाला मारहाण, सरपंच हितेश राउत संतप्‍त

पोलीस उपनिरीक्षकांविरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार

News Today 
वणी :- पोलीस स्‍टेशनमधील अनागोंदी कारभार काही केल्‍या संपुष्‍टात येतांना दिसत नाही. अधिकारी तथा कर्मचारयांचा मनमानी कारभार शिगेला पोहचला आहे. शासनाच्‍या धोरणाला हरताळ फासुन शेती पुरक व्‍यवसाय करणारया शेतकरयाला पोलीस उप निरीक्षकांनी मारहाण केल्‍याची घटना उघडकीस आली आहे. याघटनेने अहेरल्‍लीचे सरपंच हितेश राउत चांगलेच संतप्‍त झाले आहे. त्‍यांनी पोलीस उप निरीक्षक गुल्‍हाने यांच्‍या विरोधात पालकमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

वणी पोलीस स्‍टेशनमध्‍ये कार्यरत पोलीस अधिकारी तथा कर्मचारी यांच्‍या विरोधात वरीष्‍टांकडे तक्रारीचा सपाटा लावला जात आहे. सातत्‍याने घडत असलेल्‍या घटनांनी पोलीस प्रशासनाच्‍या अब्रुची लक्‍तरे वेशिवर टांगल्‍या जात आहे. कर्मचारी सैराट वागत आहे. अधिकारी मनमानी करत आहे. असे असतांना डिवायएसपी गणेश किंद्रे बघ्‍याची भुमिका घेत आहे. त्‍यांच्‍या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण होत आहे.

वणी ठाणेदारांची नुकतीच उचलबांगडी करण्‍यात आली आहे. डीबी प्रमुख विकास धडसेंच्‍या धमकी प्रकरणाची व्‍याप्‍ती वाढतच आहे. एका घटनेचे मळभ दुर सारत नाही तर खाकीची प्रतिमा डागाळणारी दुसरी घटना घडत आहे. शेती पुरक व्‍यवसाय करणारया निष्‍पाप शेतकरयाला शहरातील दिपक चौपाटी परीसरात पोलीस उप निरीक्षक गुल्‍हाने यांनी मारहाण केल्‍याचा आरोप सरपंच हितेश राउत यांनी केला आहे. तर घटनेची तक्रारी पालकमत्र्यांना केली आहे.

तक्रारीत शेतकरयांनी शेती सोबतच जोडधंदा करुन आर्थिक उन्‍नती साधावी असे शासनाचे धोरण आहे. माञ वणी पोलीस ठाण्‍यातील डीबी पथकातील अधिकारयांने कोंबडया विकत घेणारया शेतकरयांना मारहाण करुन पिटाळुन लावल्‍याची घटना रविवार दिनांक 2 फेब्रुवारीला जञा मैदान परिसरात घडल्‍याचा आरोप सरपंच राउत यांनी केला आहे.

रविवारी शहरातील जञा मैदान परीसरात व्‍यापारी जातीवंत कोंबडयांची विक्री करत होते तर अनेक शेतकरी कोंबडे व कोंबडया विकत घेण्‍यासाठी आले होते. यादरम्‍यान पोलीस उप निरिक्षक गुल्‍हाणे हे आपल्‍या डीबी प‍थकांसह तेथे आले. त्‍यांनी कोंबडे विक्रेत्‍यांना मज्‍जाव करत कोंबडे विकत घेत असलेल्‍या शेतकरयांना मारहाण केली. असा आरोप तक्रारीतुन राउत यांनी केला आहे.

पालीस स्‍टेशन हददीत कोंबड बाजार खेळणारयांना मुभा दिली जात आहे. यामुळे पोलीसांची भुमिका संशयास्‍पद असल्‍याचा आरोपही सरपंच राउत यांनी केला आहे. तर शेतकरयांनी जोडधंदा करु नये का असा प्रश्‍न तक्रारीतुन उपस्थित केला आहे.याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक गुल्‍हाने यांचेवर काय कारवाई होणार हे बघणे औत्‍सुक्‍याचे ठरणार आहे.

     वणी पोलिस स्टेशन मध्ये चालले तरी काय ?

येथील पोलिस स्टेशन दररोज नवनवीन वादात अडकले दिसून येत आहे. पोलिस कर्मचारीच या ना त्या वादात गुंतून असल्याचे निदर्शनात येत आहे. वाळू तस्करी, वारली मटका, जुगार अड्डे, अविध्य दारू विक्री, कोळसा तस्करी जोमात सुरू आहे. अश्या गैर कायदेशीर प्रकारात चक्क पोलिसच भागीदारी करून कायदा व सू व्यस्वस्था धोक्यात आणत आहे. गैर कायदेशीर व्यावसायिकांना अभय देत आहे तर सर्व सामान्य जनतेला दंडुके शाही दाखवत आहे. त्यामुळे नेमके या पोलिस स्टेशन मध्ये चालले तरी काय हे समजायला मार्ग गवसत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter