News Today
कायर : तालुक्यातील कुंड्रा या गावांमध्ये भव्य कबड्डीचे खुले सामने आयोजन दिनांक २ ते 4 जानेवारी पर्यंत हनुमान मंदिराच्या भव्य पटांगणावर करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते तारीख २ वरोजी रात्री ८ वाजता करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वणीतील युवा उद्योजक ऍड. कुणाल चोरडिया, प्रमुख अतिथी म्हणून श्री गुरुदेव सेनेचे अध्यक्ष दिलीप भोयर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष कुचनकर, वणी येथील सामाजिक कार्यकर्ते रुद्रापाटील कुचनकार प.स. चे माजी सभापती सुधाकर गोरे, सरपंच विजय ठावरी, ग्रा. पं. सदस्य बाळकृष्ण गेडाम, पोलीस पाटील चंद्रशेखर कोंगरे नंदकिशोर अंभोरे , संदीप ढेगळे, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती पाटील थेरे, शुभम गोरे, सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य आयोजक मंगेश गोरे, उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजय कुमरे यांनी केले तर आभार सुभाष आत्राम यांनी केले. यावेळी गावातील शेकडो नागरिक व उपस्थित होते.