जलजिवन योजना, शिंदोल्यातील देवस्थानाच्या जमिनी, व सीसीआय कापूस खरेदीबाबत प्रश्न
News Today (दिलीप भोयर)
वणी :- येथील विधानसभेचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांनी नागपूर येथे चालू आलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या भाषणात मतदार संघातील जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रलंबित असलेल्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडून वाचा फोडल्याने आमदार देरकर यांनी तमाम मतदारांची मने जिंकल्याने सर्वत्र त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची चर्चा होताना दिसून येत आहे.
नुकतीच राज्यातील विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून जेमतेम सरकार स्थापन होऊन पहिलेच अधिवेशन नागपूर येथे संपन्न होत आहे. या पहिल्या अधिवेशनात आज तारीख १८ रोजी राज्याचे महामहीम राज्यपाल यांच्या अभि भाषणावर वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांना बोलण्याची संधी मिळाली असता त्यांनी वणी , मारेगाव ल, झरि तालुक्यातील जलजिवण योजनेअंतर्गत अत्यंत संथ गतीने चालू असलेल्या कामाबाबत कामांना गती देण्यासाठी सरकारने निधी देवून २४१ गावातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा,
तसेच वणी तालुक्यातील शिंदोला परिसरातील देवस्थानाची जमीन शेतकरी कसत असून ७/१२ वर त्या शेतकर्यांनी नावे नाही त्यामुळे त्यांनी पिकविलेला कापूस सीसीआय खरेदी करून घेत नाही. त्यांचा कापूस सीसीआयने खरेदी करण्यासाठी तहसीलदार यांचे पत्र असूनही खरेदी केल्या जात नसल्याने सरकारने त्यांना कापूस खरेदीचे आदेश द्यावे व सीसीआय खरेदीचे केंद्र वाढविण्यात यावे,
तसेच शिरपूर – कोरपणा मार्ग हा पुर्णतः खड्डेमय झाला आहे. तो मार्ग अवघ्या दोन वर्षात उद्ध्वस्त झाला आहे तो तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी आमदार देरकर यांनी केल्याने हे तिन्ही प्रश्न अत्यंत जनतेच्या जिव्हाळ्याचे असून आजपर्यंत वणीच्या इतिहासातील कोणत्याही आमदाराने सरकार दरबारी मांडले नाही.
उघडा लिंक बघा आमदार संजय देरकर यांचा व्हिडिओ
https://www.facebook.com/share/v/18oMVsfdeg/
आमदार संजय देरकर यांनी आज विधिमंडळाच्या पायरीवर पराटीचे झाड नेवून शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाकडे सरकारचे लक्ष वेधले व पहिल्याच भाषणात जोरदारपणे अत्यंत प्रलंबित असलेले प्रश्न मांडून सरकारच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे आमदार देरकर यांनी वणी विधानसभेच्या प्रत्येक मतदारांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आज त्यांनी केलेल्या अप्रतिम कामगीरीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.