News Today
दिलीप भोयर
पंढरपूर :- येथील शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज ता. ६ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास ५०० च्या बनवत नोटा बाळगणाऱ्याणा एका चार ते पाच जणांच्या समूहाला अटक करण्यात आली आहे. त्यांचे जवळून लाखो बनावट रुपये जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
पंढरपूर पोलिसांच्या गुप्तचर विभागाला काही लोक बॅगमध्ये भरून पंढरपुरात दाखल झाले आहे. त्यांचे जवळ लाखो बनावट रुपये आहे. अशी माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार विश्वजित घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सापडा रचण्यात आला व संशयितांची झडती घेताच लाखो रुपये मिळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी अटक करण्यात आली आहे. वृत्त लीहेपर्यंत गुन्हा नोंद करायची प्रक्रिया सुरू असू शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक विश्वजित घोडके यांचे मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे. येवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कारवाईची संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कौतुक केल्या जात आहे.