News Today
दिलीप भोयर
वणी :- संपूर्ण महाराष्ट्रातून जनुकाही एकमेव वणी विधानसभेतील माजी आ. बोदकुरवार हेच फक्त पराजीत झाल्याची स्थिती सद्या रडून भागून केल्या जात असल्याची चर्चा होताना दिसून येत आहे. आपल्या पराभवाचे खापर भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे नाव घेवून फोडल्याने पक्ष शिस्तीचा भंग झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे आ. बोदकुरवार यांचेवर पक्षश्रेष्ठी कडून कोणती ठोस कारवाई केल्या जाईल का ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच बोदकुरवार यांच्या पक्ष विरोधी पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या काही भाजपच्या नेत्यांवरची पक्ष विरोधी कार्यात सहभाग नोंदविल्याने त्यांचेवरही कारवाईची टांगती तलवार दिसून येत असल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पार्टीचे मागील १० वर्षापासून वणी विधानसभेत आमदार म्हणून सत्ता भोगणारे माजी आ. बोदकुरवार यांना नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचेकडून मोठ्या मताधिक्याने पराजय व्हावे लागले आहे.
या पराभवाने चीतर बितर झालेले बोदकुरवार यांनी आपल्या पराभवाचे खापर पक्षातीलच जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले तारेंद्र बोर्डे यांचेवर फोडत पक्षा सोबत गद्दारी केल्याचा अत्यंत गंभीर आरोप लावला आहे. बोर्डे यांचे नेतृत्वात यवतमाळ, राळेगाव, आर्णी, व वणी अश्या चार विधानसभा उमेदवार निवडून आणायची जबाबदारी होती.
यातील राळेगाव व आर्णी या दोन जागेवर भरघोस मतांनी भाजपचे उमेदवार निवडून आले तर यवतमाळ आणि वणी येथील उमेदवारांना पराजय स्वीकारावा लागला आहे. वणी पेक्षा यवतमाळ येथील भाजपचे उमेदवार माजीमंत्री मदन येरावार हे अनेकवेळा आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भोगलेले असून त्यांचे कार्य बोदकुरवार यांचे पेक्षा किती तरी पटीने मोठे आहे. परंतु त्यांना देखील जनतेनी नाकारले. पण त्यांनी कोणावरही आरोप केले नाही. इथे त्यांची खरी राजकीय परिपक्वता दिसून आली आहे.
माजी मंत्री मदन येरावार हे एक संयमी राजकारणी असून यांनी आपल्या पराभवाचे खापर कोणावरही न फोडता आपल्या पराभवाची जबाबदारी स्वतः स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केल्या जात आहे. परंतु बोदकुरवार यांनी आपल्या परभावानंतर रडून फडून जनतेची व पक्षाची सहानुभूती मिळविण्यासाठी एक ड्रामा केल्याचे आरोप मतदारांमधून केल्या जात आहे. तेवढ्यावर ते थांबले नाही तर त्यांनी तारीख १ डिसेंबर रोजी एक पत्रकार परिषद घेवून आपल्या पराभवाला जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे आहे. असे जाहीरपने सांगितले आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद चक्क पक्ष विरोधी ठरल्याचे मत काही राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
तसेच बोदकुरवार यांनी बोर्डे यांनी पक्षासोबत गद्दारी केल्याचा अती गंभीर आरोप केल्याने बोदकुरवार हे पक्ष शिस्तीच्या कारवाईस पात्र ठरत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप एक शिस्तबध्द पक्ष असून अश्या शिस्तभंग करणाऱ्या माजी आमदारावर खरंच पक्षश्रेष्ठी कोणती कारवाई करतील की त्यावर पांघरून घालतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. या गंभीर बाबीकडे पक्षाने दुर्लक्ष केल्यास येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर पालिका व जिल्हा परिषद, पंचायत समित्याच्या निवडणुकीत भाजपला चांगलाच थक्का बसण्याची शक्यता वाढली आहे.
बोदकुरवार व तारेंद्र बोर्डे यांचा वाद विकोपाला
निवडणुकीत पराभव मिळाला म्हणून पराभवाचे खापर भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचेवर माजी आमदार बोदकुरवार यांनी फोडले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्याच बरोबर पक्षा सोबत गद्दारी केल्याचा गंभीर आरोप लावल्याने बोर्डे समर्थकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या बोर्डे यांचेवर झालेल्या आरोपांमुळे भाजपची प्रतिमा पुर्णतः माजी आ. बोडकुरवार यांनी मल्लिन केल्याचे बोलल्या जात आहे. आता या दोघांचा वाद चांगलाच विकोपाला गेला असून वरिष्ठ पातळीवर या वादाचे काय निराकरण केल्या जाईल याची प्रतीक्षा आहे. तसेच तारेंद्र बोर्डे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचे पुर्णतः खंडन केले आहे. याबाबत त्यांनी एक पत्रकही प्रसिद्धीस काढले आहे.