News Today
दिलीप भोयर
वणी :- विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर भारतीय जनता पार्टीचे पराजयित उमेदवार माजी आ. बोदकुरवार यांच्या भावुक व्हिडिओ वायरल झाला आणि तेव्हापासून जणू काही विधानसभेवर डोंगर कोसळला असल्या सारखे अनेक जन बोदकुरवारांच्या भेटायला जावून आपले नयन अश्रू वाहून घेत होते. परंतु त्यातही काही जण केवळ मज्जा घेण्यासाठी तिकडे जावून रडत आहे. व नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचेकडे जावून प्रफुल्लित होऊन शुभेच्छा देखील देताना दिसून येत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रेमातही भाजप मात्र घोटाळा करण्यात मागे नाही अशी चर्चा रंगत आहे.
निवडणूक प्रणाली ही लोकशाहीचं प्रतीक आहे आणि जनतेनी निवडून द्यायचं की नाही हा अधिकार जनतेला आहे. दर पाच वर्षांनी आपला प्रतिनिधी बदलवायचा की नाही हे जनतेच्या हातात असताना नुकतीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी आ. बोदकुरवार यांना जनतेकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव त्यांनी चांगलाच जिव्हारी लावून घेतल्याचे दिसून येत आहे.
मतदान प्रक्रिया असल्याने जो उमेदवार बहुमत घेतो तो विजयी ठरतो. परंतु पराभव झाला म्हणून रडण्याचे काही कारण नाही. तसे असते तर माजी आमदार वामनराव कासावार हे २० वर्ष आमदार म्हणून कार्यकाळ काढणारे एकमेव आमदार आहेत ते देखील २००४,२०१४,२०१९ असे तीनदा पराभूत झाले. त्याच बरोबर माजी आमदार विश्वास नांदेकर हे देखील २००९,२०१४,२०१९ मध्ये पराभूत झाले.
त्याच बरोबर १९९९, २००९, २०१४, २०१९ असे चारदा संजय दरेकर हे पराभूत झाले होते. मनसेचे राजू उंबरकर यांनी देखील २००९, २०१४, २०१९,२०२४ आहे चार वेळा निवडणूक लढून पराभव पत्करला परंतु यातील एकाही उमेदवारांनी आपल्या डोळ्यातून अश्रू वाहले नाही. आणि कोणत्याही कार्यकर्त्यांनी आपली हुंकार फोडला नाही. उलट भाऊ आपण आणखी लढू हेच बोलताना दिसून येत होते.
नुकत्याच विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार माजी. आ. बोदकुरवार यांचा जनतेनी प्रचंड बहुमताने पराभव केला. साहजिकच आहे. भाजप कडून बहुसंख्य असलेल्या समाजाचा प्रतिनिधी न देता अत्यल्प असलेल्या समाजाला प्रतिनिधित्व देत असेल तर बहुसंख्य असलेला समाज हा अपमान सहन करू शकत नाही. लोकसभेत जे घडलं ते विधानसभेत घडणार हे सर्वश्रुत असताना सुद्धा तीच चूक करणे भाजपला भोगावी लागली आहे.
पराभव झाला म्हणून आ. बोदकुरवार हे भावुक होऊन डोळ्यातून अश्रू काढत असेल तर यात काहीही नवल नाही. निवडणूक संपताच तेच कार्यकर्ते नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांना शुभेच्छा देवून माजी आ. बोदकुरवार यांची भेट घ्यायला जात असतात व उगीच डोळ्यातून अश्रू पाडून घेत असल्याचे वास्तव निर्दशनास आले आहे.
लिंगटी हे गाव बोदकुरवारांचे असून तेथील एका संस्थेचे पदाधिकारी हे चक्क रडताना व्हिडिओत दिसत आहे. तर तेच पदाधिकारी आ. संजय देरकर यांना शुभेच्छा देखील देत आहे. त्यामुळे रडण्याचा हा गोरख धंदा केवळ सहानुभूतीसाठी तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला असून जनतेच्या प्रेमाचा माजी आं. बोदकुरवार हे घोटाळा करायला विसरले नाही अशी जोरदार चर्चा वणी विधानसभेत रंगत आहे.
करा क्लिक बघा व्हिडिओ