Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeवणीखा. संजय देशमुखांची भेट घेवून आ. संजय देरकर मातोश्रीकडे रवाना

खा. संजय देशमुखांची भेट घेवून आ. संजय देरकर मातोश्रीकडे रवाना

News Today 

दिलीप भोयर

वणी :- यवतमाळ – वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांची भेट घेवून आज ता.२४ रोजी वणीचे नवनिर्वाचक लोकप्रिय आमदार संजय देरकर हे यवतमाळ येथून नागपूर व नागपूर वरून मुंबई मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी रवाना झाले आहे.

आमदार संजय देरकर यांनी यवतमाळ येथील एका खासगी हॉटेल मध्ये खासदार संजय देशमुख यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान खा. देशमुख यांनी राजकीय पटलावरची चर्चा करून महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,  मास्कवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी व सर्व घटक पक्ष तथा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले. तसेच आमदार देरकर यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार संजय देरकर व त्यांच्या पत्नी सौ. किरण देरकर यांचेसह संजय निखाडे, दिलीप भोयर, डॉ विवेक गोफणे, संघदीप भगत नागेश किनाके आदी उपस्थित होते.

या भेटी दरम्यान लगेच खा. देशमुख यांनी आमदार संजय देरकर यांना घेवून मुंबईला मातोश्रीवर  जायचे ठरविले व तिकडूनच ते मुंबईला रवाना झाले. उद्या ता. २५ रोजी आमदार संजय देरकर हे मुंबईला पोहचणार असून खा. संजय देशमुख यांचे सोबत मातोश्रीवर सकाळी पोहचणार आहे. त्यांचे सोबत शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, व इतर पदाधिकारी उपस्थित असणार आहे.

संपूर्ण विदर्भातून शिवसेना उबाठा गटाचे एकमेव आमदार संजय देरकर हे निवडणूक जिंकणारे उमेदवार आहे. त्यामुळे त्यांची मोठी जबाबदारी देखील वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter