Thursday, December 12, 2024
Google search engine
HomeवणीEvm ठेवालेल्या गोदामावर शिवसैनिकांचा CCTV सह खडा पहारा सुरू

Evm ठेवालेल्या गोदामावर शिवसैनिकांचा CCTV सह खडा पहारा सुरू

News Today 

दिलीप भोयर

वणी :- येथील छ. शिवाजी महाराज चौकात EVM ठेवलेल्या गोदामाजवळ संशयास्पद इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेले वाहन आढळताच ते वाहन पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. या वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनाचे अनेक दस्त देखील बोगस आहे. या पकडण्यात आलेल्या वाहनाची माहिती शहरात पसरताच शहरातील व ग्रामीण भागातील हजारो युवकांनी पोलिस स्टेशन परिसरात बग्याची गर्दी केली. या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांची देखील चांगलीच धावाधाव झाली. एकंदरीत सर्व प्रकार लक्षात घेवून शिवसेना (उबाठा) गटाकडून EVM गोदामापुढील दोन्ही  दारासमोर CCTV कॅमेरे व कार्यकर्त्यांचा खडा पहारा सुरू केला आहे. 

राज्यात निवडणूक संपन्न होताच सर्व उमेदवारांचे भाग्य व मतदारांचे हक्क अधिकार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये बंद झाले आहे. हे इलेक्ट्रॉनिक मशीन एक सॉफ्टवेअर शिष्टम पद्धतीने अपडेट असल्याने या evm मशीनचा वापर धोकादायक असल्याचे अनेक वैधानिक व प्रगत देशाचे मत आहे. अमेरिका सारखा देश कागदी मत पत्रिकेवर मतदान प्रक्रिया पूर्ण करीत आहे. परंतु भारत असा देश आहे की तो या मशीनने मतदान प्रक्रिया राबवित आहे. त्यामुळे या evm मशीन बाबत जनसामान्य नागरिकांमध्ये विश्वासार्हता गमावली आहे.

काल ता. २१ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास संशयास्पदरित्या आढळलेल्या वाहनातील इंटरनेट व मोबाईल क्षेत्राशी जुळलेले साहित्य आढळले असून त्या वाहनाचे कोणतेही दस्त सुरळीत नव्हते. त्याच बरोबर हे तांत्रिक बाबीसी जुळलेले साहित्य असल्याने पोलिस प्रशासनाला याची कोणतीही ठोस पुष्ठी करता आली. शेवटी BSNL कंपनीच्या अभियंत्याला बोलवून  त्या साहित्याची पुष्टी करण्यात आली परंतु त्यांना देखील कोणत्याही निर्णयापर्यंत जाता येत नव्हते. त्यामुळे जिल्हा पातळीवरून अभियंते बोलविण्याचे पोलिस प्रशासनाकडून ठरविण्यात आले. या प्रकारांची उचित चौकशी करून कारवाई करण्यासाठी संजय देरकर यांनी तक्रार नोंदविली आहे. 

त्यामुळे तांत्रिक बाबिमध्ये कोणीही निपुण नाही. म्हणून महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी evm ठेवलेल्या गोदामापुढे व्यक्तिगत cctv कॅमेरे व युवा सेनेचे अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात काही कार्यकर्त्यांना खडा पहारा देण्यासाठी तैनात केले आहे. हे कार्यकर्ते दोन दिवस पाहा देतील. 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter