News Today
वणी :- विधानसभा निवडणूक प्रचार काळात श्रीगुरुदेव सेनेच्या वतीने वणी तालुक्यातील गावो गावी जावून मतदार जागृती अभियान राबविल्याने मतदानाच्या टक्क्यात ऐतीहासिक ७६.८८ वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा महाविकास आघाडीला फायदा झाला असून मशालीचा विजय पक्का झाला आहे. अशी चर्चा आता वणी तालुक्यात पसरली आहे.
वणी विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबर रोजी संपन्न झाली आहे. या निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर आला आहे. या निकालाची सर्वांना उत्सुकता वाढली आहे.
प्रबोधनातून प्रचार व भजनातून जनजागृती करण्यासाठी जाहीर समर्थन यात्रा एका रथा व्दारे काढली होती. या यात्रेला श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर यांनी शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर प्रकाश टाकून देशावर व शेतकऱ्यांवर येणाऱ्या संकटावर प्रकाश टाकला तसेच शेतकऱ्यांच्या शेत्या कश्या पद्धतीने संकटात येत असून शेती व्यवसाय धोक्यात आल्याचे दिसत आहे.
उद्योगपती वर्ग शेतकऱ्यांवर कसे संकट तयार करीत आहे. यावर जोरदार प्रकाश टाकला. व मतदारांना महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे ही यात्रा प्रचंड प्रभावी ठरली की गावातील अनेक मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानचा हक्क बजावला व आपले मतदान महाविकास आघाडीकडे वळवले.
श्रीगुरुदेव सेनेकडून तारीख ५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत ७० गावात या जाहीर समर्थन यात्रा जावून मतदार जागृती अभियान राबविले, त्यामुळे या मतदानात प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली आहे. अशी चर्चा गावागावात होत आहे.