News Today
दिलीप भोयर
वणी – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपा व संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी मतदानाच्या एक दिवस अगोदर आज दिनांक १९ रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास वणी येथील गोकुळ नगरातील एका घरी पैसे वाटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारचा व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल झाला आहे. त्यामुळे वणी विधानसभा मतदार संघात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची निवडणूक आयोग दाखल घेवून कारवाई करणार की भाजपची पाठराखण करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
सर्वपक्षीय निवडणुकांमध्ये आचारसंहिता लागू असताना, एका व्हायरल व्हिडीओमध्ये भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी काही मतदारांना गठ्ठा मतडारलन खरेदीसाठी बोली बोलल्या जात आहे. या व्हिडीओमुळे यवतमाळ जिल्ह्यात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओमध्ये मतदारांना तात्काळ पैसे देण्याचा स्पष्ट दृश्य आहे.
या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या शुद्धतेवर मोठे संकट आले आहे. मतदानाच्या आचारसंहितेचे पालन करण्यासाठी अनेक पातळीवर मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत असताना, अशा प्रकारच्या आरोपांनी निवडणुकांच्या पारदर्शकतेला गंभीर धक्का बसलेला आहे. या व्हिडिओची सत्यता पळतळणी करून उचित कारवाई करण्याची जोरदार मागणी मतदारांकडून केली जात आहे.
बघा व्हिडिओ