News Today
प्रतिनिधी
वणी :- वणी विधानसभा क्षेत्रात सत्ताधारी सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज असल्याने यावेळी जे अपक्ष उमेदवार खोक्यांची संस्कृती चालवून मतविभागणी करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरले आहे. अश्या उमेदवाराचे मनसुबे मतदारांनी ओळखले आहे. त्यामुळे मतदार आपल्या मनातील मतदान हे त्यांनी ठरवलेल्या उमेदवारालाच देवून खोके बहाद्दर अपक्ष उमेदवारांना मात्र मतदारांकडून चांगलेच ” खाडे ” मारून जाग्यावर बसविण्याची असल्याची जोरदार चर्चा आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे अनेक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या या रिंगणात उभे केले आहे. या उमेदवारांचे भाग्य २० नोव्हेंबर रोजी इलेक्ट्रिक वोटिंग मशीन मध्ये बंद होणार आहे. या निवडणुकीतील उमेदवारांनी आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतीने प्रचार कार्य सुरू केले आहे.
निवडणुकीत शेतकरी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून शेतकरी ज्या पक्षाकडे वळतील त्या उमेदवारांचा विजय निच्छित आहे. मागील दहा वर्षापासून सत्तेतील सरकारने मात्र शेतकऱ्यांना पिळून पिळून टाकले आहे. त्यामुळे तमाम शेतकरी बांधवांमध्ये सरकार व त्यांच्या उमेदवारांप्रती रोष निर्माण होऊन आहे. हा रोष मतदारांच्या मतदानातून व्यक्त होणारा आहे. त्यामुळे विरोधपक्षतील उमेदरांना जमेची बाजू आहे.
ही जमेची बाजू मोडून काढण्यासाठी शेतकरी एकतेचे मते विभाजन करून राजकीय सत्तेची मलाई लाटण्यासाठी सत्ताधारी पक्षातील कुबुद्धिजीवी लोकांनी काही खोके बहाद्दर उमेदवार रिंगणात उतरवले आहे. परंतु या प्रकारचे बिंग मतदारांमध्ये उघड झाले आहे.
वणी विधानसभेतील काही खोके बहाद्दर अपक्ष बोके उमेदवारांना मतदार चांगलेच खाडे मारणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.