संजय देरकरांच्या प्रवाहात प्रचंड मोठी वाढ
News Todat
दिलीप भोयर
वणी :- येथील विधानसभेतील निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करणारे उमेदवार यशवंत शिवराम बोंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेवून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे संजय देरकरांच्या प्रवाहात प्रचंड मोठी वाढ होत आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांची आज नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख आहे. यातच आज ओबीसी समाजातील असलेले अपक्ष उमेदवार यशवंत बोंडे यांनी आज समाजाला एकत्रित येण्याची गरज आहे. तरच शेतकरी विरोधी धोरण राबणाऱ्या भाजपाला पराभूत करता येईल असे मनोगत व्यक्त करून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेवून संजय देरकर यांना जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.
त्यांनी कार्यकर्त्यांसह सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचे पारडे जड झाले आहे.