संजय देरकरांच्या पाठीशी उभे झाले राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे मोठे पाठबळ , भाजपमध्ये भरली धास्ती
रागोपाच्या उमेदवाराचे नामांकन मागे, महाविकासला पाठिंबा
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे उमेदवार प्रवीण रामाजी आत्राम यांनी आपली उमेदवारी नामांकन मागे घेवून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना आज तारीख ४ रोजी संजय देरकर यांची निवासस्थानी भेट घेवून आपला पाठिंबा घोषित केला आहे. त्यामुळे रागोंपाचे मोठे पाठबळ देरकरांच्या पाठीशी उभे झाले आहे.
वणी विधानसभेतील मारेगाव, झरी तालुक्यात आदिवासी समाजाची खूप मोठी ताकद आहे. यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रीय गोंडवाना पार्टी सोबत जुळलेले आहे. तसेच प्रवीण आत्राम यांचे सामाजिक कार्य देखील समाजामध्ये दाखल पात्र आहे.
प्रवीण आत्राम यांनी आपले आज उमेदवारी नामांकन अर्ज मागे घेवून महा विकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना पाठिंबा दर्शविल्याने महाविकास आघाडीला जोरदार ताकद मिळाली आहे.यावेळी सुनील कातकडे, संजय निखाडे, रवी ठाकरे, दीपक कोकास, कपिल बोरले आदी उपस्थित होते.