वणी न्युज टुडेचे भाकीत खरे ठरले, शेवटी खोके आले कामी
News Today
दिलीप भोयर
वणी :- महाविकास आघाडी कडून वणी विधानसभेची उमेदवारी ओबीसी समाजातील संजय देरकर यांना जाहीर होताच भाजपाने आपले रंग बदलवायला सुरवात केली होती. ओबीसी मतांची विभागणी कशी करता येईल याचे षडयंत्र रचले आणि या षडयंत्रात भाजप यशस्वी झाली आहे. भाजप ही कुटील डाव रचून मोठी खेळी करतील याचे भाकीत वणी न्युज टुडेनी अगोदरच केले होते. शेवटी तेच घडले त्यामुळे भाजपाचे खोके आले कामी अशी चर्चा आहे.
राज्यातील महत्वाचे तीन राजकीय पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेना (उबाठा) गट एकत्रित येवून महाविकास आघाडीच्या नावाने राज्यात निवडणूक लढवीत आहे. यातील तिन्ही पक्षांनी ८५-८५-८५ असा जागा वाटपाच्या फार्मुल्याचा वापर केला आहे.
महाविकास आघाडी तयार झाल्याने राज्यात भाजपला पाणी फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यातच मतदारांनी देखील मागील लोकसभेत महाविकास आघाडीला साथ देवून राज्यात १३ काँग्रेस, ९ शिवसेना, तर ८ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून दिले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची ताकद चांगलीच वाढली आहे.
राज्याच्या विधानसभेतल्या निवडणुकीतही महाविकास आघाडीची कायम असल्याने अनेक हवसे, गवसे, नवस्यना आमदारकीचे वेध लागले होते. काहींच्या तर उघड्या डोळ्यात आमदार झाल्याचे स्वप्न रंगले होते. यात वणी विधानसभा देखील अपवाद ठरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ७ जागे पैकी ५ जागा काँग्रेस, १ जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर १ जागा शिवसेनेच्या वाट्याला मिळाली आहे. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद मोठी असूनही एका जागेवर समाधान मानून शिवसेनेने महाविकास आघाडी धर्म पाळून कुठच बंडखोरी केली नाही. परंतु काँग्रेसला तब्बल ५ जागा जावूनही काँग्रेसचे काही स्वयंम घोषित नेते असंतुष्ट दिसून आले व त्यांनी स्वंतत्र उमेदवारी दाखल करून पक्षा पेक्षाही मीच मोठा असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केले आहे. त्यामुळे ते स्वतःच्या बाल बुद्धीचे मानकरी ठरले आहे. त्यामुळे समाज मनातून त्यांची प्रतिष्ठा मात्र पूर्ण उतरून गेली आहे.
वणी विधानसभेची उमेदवारी ही महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा गटाला जाताच भारतीय जनता पार्टीच्या नाळ्या थंडावल्या होत्या त्यामुळे भाजपाकडून मोठीं खेळी होणार हे सर्वांच्या लक्षात आले होते. व तसे भाकीत देखील न्युज टुडे माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचले होते शेवटी तेच घडले. परंतु काहीही झाले तरी आणि कितीही अपक्ष उभे असेल तरी मतदारांनी मात्र मनात ठरवले आहे की यावेळी भाजपला जागा दाखवायचीच असा निर्धार केल्याचे कळते आहे. कोणत्याही अपक्ष उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका नाही. जे लोकसभेत घडले तेच विधानसभेत घडणार अशी चर्चा मतदारांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे भाजपची डोके दुखी कितीही खोके खर्च केले तरी बसणार नाही.