महाविकास आघाडीची धुरा माजी आमदार वामनराव कासावरांच्या खांद्यावर
घटक पक्षांतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत खा.देशमुखांची यशस्वी चर्चा
News Today
दिलीप भोयर
वणी :- वणी विधानसभा क्षेत्राची जागा शिवसेना (उबाठा) गटाच्या वाट्याला आली असून विधानसभेसाठी संजय देरकर यांची उमेदवारी जाहीर झाली असून देरकर हे मशाल या चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. येत्या २९ तारखेला नामांकन अर्ज भरल्या जाणार आहे. यावेळी महाविकास आघाडीत कोणताही घटक नाराज राहू नये यासाठी यवतमाळ – वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख हे आज तारीख २७ रोजी सायंकाळी ५ वाजता वणीत दाखल झाले व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेवून सर्वांचा समन्वय साधून संजय देरकर यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा करून परत गेले आहे.
२० नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर महाविकास आघाडी कडून शिवसेना (उबाठा ) गटाला मिळालेल्या जागेवर संजय देरकर यांच्या हाती मशाल आली आहे. तेव्हापासून सर्व सामान्य शिवसैनिकांच्या अंगात विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी उत्साह संचारला आहे. परंतु काही शिवसेनेतील व काँग्रेस मधील पदाधिकारी हे नाराजी नाट्य धरून बसले होते. त्यामुळे यांची भेट घेवून त्यांना एकसंघाने निवडणुकीच्या प्रवाहात आणून महाविकास आघाडीला विजय मिळावा यासाठी एकत्रित करणे गरजेचे होते. त्यासाठी खासदार संजय देशमुख हे आज वणीत दाखल झाले त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली व यावेळी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेवून चर्चा केली.
यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांनी काँग्रेस पक्ष व पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे महाविकास आघाडी सोबत असून संजय देरकरांच्या खांद्याला खांदा लावून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या देखील पदाधिकाऱ्यांना बोलवून भेट खा. देशमुख यांनी भेट घेतली यावेळी व कामाला लागा म्हणून सूचना दिल्या यावेळी राकापचे विधानसभा अध्यक्ष सूर्यकांत खाडे, दिलीप भोयर, वणी तालुकाध्यक्षा प्रवीण खारकर, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे, मारेगाव तालुकाध्यक्ष भारत मत्ते, शहराध्यक्ष मुन्नाभाई शेख, झरि तालुकाध्यक्ष प्रमोद थेरे, शहराध्यक्ष राकेश सोयाम, रामदास पखाले , मनोज दुर्गे, आदी मान्यवर उपस्थित होते.
वसंत जिनिगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांचे सोबत चर्चा करताना खा. संजय देशमुख सोबत शिवसेना नेते राजेंद्र गायकवाड संजय निखाडे, राजू येल्टीवार व मविआचे उमेदवार संजय देरकर
त्यानंतर वसंत जीनिंगचे अध्यक्ष आशिष खुळसंगे यांच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली असता खुलसंगे यांनी देखील महाविकास सोबत राहण्याची शास्वती दिली. तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांची भेट घेतली व त्यांनी ही महाविकास सोबत असल्याची खात्री खा. देशमुखांना दिली आहे. त्याच बरोबर संजय खाडे यांची ही त्यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे कोहाचेही मनभेद व मतभेद उरले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याची चर्चा संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात सुरू झाली आहे.
माजी आमदार कासावार यांचे कडून खा. देशमुखांचे स्वागत
खा. संजय देशमुख हे पहिल्यांदाच वणी मध्ये आले असता त्यांनी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या धोरणावर चर्चा करण्यासाठी माजी आमदार वामनराव कासावार यांची निवासस्थानी भेट घेतली असता कासावार यांनी खासदार देशमुखांचे गुलाब पुष्पांचा बुके देवून स्वागत केले. याठिकाणी संपन्न झालेल्या बैठकीत खासदार संजय देशमुख यांनी निवडणुकीची धुराच वामनराव कासावार यांचे खांद्यावर दिली आहे . यावेळी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.