राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे विदर्भाध्यक्षा संबा वाघमारे यांच्या स्तूत उपक्रम
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील वसंत गंगा विहार कॉलनीतील रहिवासी संबाजी वाघमारे यांनी आपल्या लाडकी नात कु. अन्वी अतुल वाघमारे हिच्या वाढदिवसानिमित्त लोकसंत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवणपाल महाराज वडाळीकर यांचे जाहीर राष्ट्रीय कीर्तन व समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन तारीख ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता कॉलनीतील खुल्या मैदानावर आयोजित केला आहे.
पवनपाल महारांचे कीर्तन हे सप्तखांजेरी वादनावर असून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीता विचारावर व त्यांच्या उपदेशावर असतात त्याच बरोबर मनोरंजन, धार्मिकता व राष्ट्रीय एकात्मतेवर असतात. त्यांचे कीर्तन राज्यासह इतरही राज्यात प्रचंड गाजलेले आहे. ते एक. नामवांत कीर्तनकारा आहे . त्यांच्या संचासह ते कीर्तनाचे सादरीकरण करतात संगीतमय आणि चालू घडामोडींवर त्यांचे कीर्तन सपंन होत असल्याने अनेकांना त्यांचे कीर्तन ऐकायची आस लागलेली असते असे प्रसिद्ध किर्तनकार वणीत येत आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वसंत गंगा विहारवासी व राष्ट्रीय चर्मकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना एक वैचारिक मेजवानी मिळणार आहे. तरी या कार्यक्रमाला वणी तालुक्यातील, शहरातील, कॉलनीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघ व वसंत गंगा विहार कॉलोनी परिवाराच्या वतीने संबाजी वाघमारे यांनी केले आहे. या अनोख्या स्तुत्य उपक्रमाची संपूर्ण शहरात कौतुक केल्या जात आहे. तर कू. अंवी हिला सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा मिळत आहे.