खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची पक्षश्रेष्ठी सोबत बैठका सुरू
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेते संजय खाडे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतल्याने महाविकस आघाडीत बिघडी होण्याची चिन्हं निदर्शनास आले आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी संजय खाडे यांना तातडीने दिल्ली येथे पाचारण करण्यात केले आहे. त्यांची मनधरणी ज्येष्ठ पक्षश्रेष्ठी कडून केल्या जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वणी विधानसभेत काँग्रेस पक्ष चांगला मजबूत आहे. त्याच बरोबर संजय खाडे यांनी मागील दोन वर्षात काँग्रेस पक्षासाठी अप्रतिम कामगिरी देखील केली आहे. अनेक सामाजिक कामात त्याचा हिररीने सहभाग असायला त्याच बरोबर अनेक स्तुत उपक्रम देखील त्यांनी राबविले आहे. तसेच ते खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे अगदी निकटवर्तिय म्हणून ओळखल्या जाते आहे. संजय खाडे यांनाच उमेदवारी मिळावी असा आग्रह देखील खासदार धानोरकर यांनी पक्षश्रेष्ठी कडे धरला होता. त्याचं बरोबर सांगली पॅटर्न करण्यात येईल असे देखील बोलल्या गेले होते. परंतु वणी विधानसभा ही काँग्रेसच्या वाट्याला न जाता शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वाट्याला आल्याने ती जागा शांत व सयंमी नेतृत्व करणारे सर्वच्या मनात जागा करून असणारे एक स्वच्छ व पारदर्शक प्रतिमेच व्यक्तिमत्त्व असलेले संजय देरकर यांना मिळाली आहे. सदर जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने खाडे यांचा थोडाफार हिरमोड झाला आहे. त्यामुळे खाडे नाराज असल्याचे बोलल्या जात आहे.
महाविकास आघाडीतील कोणतेही नेते अपक्ष उमेदवारी भरून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास महाविकास आघडीचेच नुकसान होईल त्यामुळे असा प्रकार कोणत्याही मतदार संघात घडू नये यासाठी सर्व पक्ष आपापल्या नाराज उमेदवारांची नाराजी दूर करीत आहे. याचाच भाग म्हणून संजय खाडे यांना पक्ष श्रेष्ठी कडून दिल्लीत बोलवण्यात आले आहे. त्यांची मनधरणी सुरू असून यात यश निछित येणार आहे.
संजय खाडे हे एक समजदार व मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व असून ते कोणतीही चूक करणार नाही असा विश्वास मतदारांना आहे. दिल्ली येथे त्यांचे बरोबर खासदार प्रतिभाताई धानोरकर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर हे उपस्थित आहे. या घडामोडीत सकारात्मक विचार होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघडीचा कोणताही धोका निर्माण होणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. सर्व मतदार खाडे यांच्या पार्टीची प्रतीक्षा धरून आहे. ते परतताच संजय देरकर हे त्यांची भेट घेणार आहे.