मारेगावत कुंभा – बोटोनी मार्गवर इस्माची हत्या
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथून जवळच असलेल्या मारेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुंभा – बोटोणी मार्गावर काल तारीख २४ रोजी रात्रीच्या दरम्यान एका इसमाचा ओळनीने गळा आवरून हत्या झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. भीमराव तुकाराम मडावी असे या घटतेन मृत झालेल्या इस्माचे नाव आहे.
मारेगाव तालुक्यातील बाभळी पोड (श्रीरामपूर) येथील भीमराव मडावी वय ३१ असे या हत्तेतील घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्ती आज तारीख २५ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास कुंभा – बोटोनी मार्गावर बोटोनी पासून २किमी अंतरावर मृत अवस्थेत पडून असल्याची माहिती मारेगाव पोलिसांना मिळताच पोलिस स्टेशनचे राजू टेकाम व दत्ता मडावी यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी मारेगावं ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्राथमिक तपासणीत त्याच्या गळ्याला गळा आवळून मारल्याच्या खुणा आढळल्या मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळखे यांनी या घटनेची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांना दिली.
उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी तात्काळ मारेगाव गाठले व तपासाची सूत्र हलवले असता हा खून असल्याचे निष्पन्न झाले असून काही संशयितांना ताब्यात घेवून विचारपूस चालू असल्याची माहिती आहे. वृत्त लीहेपर्यंत कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता या घटनेचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.