लोकशाही राज्यव्यवस्थेत मतदारांचा दर्जा मोठा आहे: योगेंद्र यादव
प्रतिनिधी (अमरावती)
News Today
गुरुकुंज मोझरी: लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणुक . यामध्ये मतदार हा मतदान करून पाच वर्षाकरिता आपला प्रतिनिधी निवडत असतो. वयाची १८ वर्षे पूर्ण झाली की मतदानाचा अधिकार प्राप्त होतो आणि आयुष्याच्या अस्तापर्यंत मतदानाचा हक्क त्याचे कडून कोणीही हिराहू शकत नाही. परंतु निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाच वर्षापर्यंतच त्या पदावर राहण्याचा अधिकार असतो. निवडून येणाऱ्या पेक्षा निवडून देणारा चा दर्जा हा नेहमीच मोठा असतो असे प्रतिपादन श्री योगेंद्र यादव यांनी श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे आयोजित ग्रामगीता तत्त्वज्ञान आचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाच्या प्रसंगी बोलताना केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या स्मृतिदिनानिमित्त श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे दरवर्षीप्रमाणे ग्रामगीता तत्त्वज्ञान आचार महायज्ञ व पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये संध्याकाळी सात वाजताच्या सत्रा मध्ये श्री योगेंद्र यादव हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
अध्यात्म गुरुकुलचे संचालक रविदादा मानव यांचेशी हितगुज करताना ज्येष्ठ समाजसेवी योगेंद्रजी यादव
हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या जनसागरासमोर लोकशाही राज्यव्यवस्थेत नागरिकांची जबाबदारी या विषयावर योगेंद्र यादव बोलत होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध सप्तखंजरी वादक प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज, अध्यात्म गुरुकुल चे संचालक रवि मानव, भारत जोडो अभियानाचे महाराष्ट्र संयोजक अविनाश काकडे, इंजी भाऊसाहेब थुटे, प्रेमकुमार बोके, डॉ धर्मपाल चिंचोळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
लोकसंत सप्तखंजेरी वादक राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराज यांचे सोबत हास्य मुद्रेत ज्येष्ठ समाजसेवी योगेंद्रजी यादव
पुढे बोलताना योगेंद्र यादव म्हणाले की धार्मिक स्थळांवर जाण्याआधी मी खूप विचार करतो,तसाच इथेही येण्यापूर्वी मी विचार केला राष्ट्रसंतांच्या व्यक्तित्व व कार्याबद्दल माहिती घेतली व माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगितलं की आपण या ठिकाणी निश्चितच गेले पाहिजे कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे लोकशाही मूल्य समाजामध्ये रुजवणारे एक राष्ट्रभक्त होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला इंग्रजांनी त्यांना जेलमध्ये टाकले हाल अपेक्षा सहन केल्या हे कळल्यानंतर तुकडोजी महाराजांबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आणि श्रद्धा आहे. आपला प्रमुख ग्रंथ ग्रामगीता हा शेतकरी काम करी वर्गाला अर्पण करणारा असा महात्मा च्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला येण्याचे सौभाग्य मिळाले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
निवडणुकीच्या काळामध्ये मतदारांना प्रलोभन दिल्या जातील धर्माभिमान व जातीचा अभिमान सांगून राष्ट्रीय एकात्मतेला पायदळी तुडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होईल परंतु आपण शुद्ध सुज्ञ नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी शांतता सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कोणत्याही अफवांच्या मागे न जाता माणुसकीच्या धर्माचे पालन करत एका सुज्ञ मतदाराप्रमाणे मतदानाचा हक्क बजावला पाहिजे अशी भूमिका प्रास्ताविक भाषणामध्ये बोलताना रवी मानव यांनी मांडली होती. इंजी भाऊसाहेब थूटे यांनी या सत्राच्या सुरुवातीला राष्ट्रसंतांनी शेतकऱ्यांविषयी लिहिलेल्या खंजरी भजनाचे सादरीकरण केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रेमकुमार बोके यांनी केले तर आभार प्रदर्शन धर्मपाल चिंचोळकर यांनी केले.
माझ्यावर झालेल्या हमल्यामुळे मी घाबरलो नाही : योगेंद्र यादव
आज दुपारी अकोला येथे एका नियोजित कार्यक्रमांमध्ये काही विघातक तत्त्वांनी आमच्यावरती हमला केला. हा दडपशाहीचा एक प्रकार मी समजतो मी त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा करायला तयार आहोत त्यांनीही तशी तयारी ठेवावी अशा हमले करून मला ते घाबरवतील असे त्यांना वाटत असेल तर त्यांचा हा समज चुकीचा आहे मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही तर यामुळे मला आणखी प्रोत्साहन मिळते.
मी त्यांना माझे विरोधक समजत नाही परंतु त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सामंजस्यांनी चर्चेचा मार्ग स्वीकारावा.