अहिरांच्या कचेरीतून बोदकुरवार यांचा पत्ता कट असल्याची विश्वसनीय माहिती
News Today
दिलीप भोयर
वणी :- वणी विधानसभेचे विद्यमान भाजपचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे शासकीय कंत्राटदार आर. व्ही. उंबरकर कस्ट्रक्षन कंपनीचे मालक नितीन रमेश उंबरकर याचे सोबत भूखंडाच्या खरेदी विक्री प्रकरणात हित संबंध उघड झाल्याने सदर प्रकरणाची भाजप पक्षश्रेष्ठीनी दखल घेतली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाचविण्यासाठी आ. बोदकुरवार यांनी आपल्या तीन सहकार्यांना घेवून गुरुवार तारीख १७ रोजी दुपारच्या सुमारास माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर (भैया) यांच्यापुढे लोटांगण घातल्याची माहिती आहे. मात्र हंसराज अहिर यांच्याकडून आ. बोदकुरवार यांना फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा आहे.

सन २०१४ व २०१९ मध्ये मोदी लाटेत वाहून आलेले आमदार संजीयरेड्डी बोदकुरवार यांना विधानसभा २०२४ मध्ये उमेदवारी मिळतील याची सर्वांना शास्वती होती. आणि त्यांनी वणी विधानसभा क्षेत्रासाठी भूतो ना भविष्य असा निधी देखील खेचून आणला. परंतु या निधीतून बांधण्यात आलेले रस्ते व इतर बांधकामे प्रचंड निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे विकास हा भकास होऊन बसला आहे. या विकास कामाच्या जरी ऑनलाईन पद्धतीने निविदा काढल्या असल्या तरी या निविदा केवळ आर. व्ही. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनीला कश्या मिळतील यासाठी निविदातील नियम व अटींचे व्यवस्थापन व्यवस्थित करून घेतल्या जात असल्याची चर्चा आता इतर कंत्राटदारांकडून दबक्या आवाजात केल्या जात आहे.
आज पर्यंतच्या कोणत्याही आमदारांनी शासकीय कंत्राटदारा सोबत कोणतेही संबंध जुळतील असा प्रकार प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या घडवून आणला नाही. परंतु आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शासकीय कंत्राटदार नितीन उंबरकर सोबत प्रत्यक्ष भूखंड खरेदी करून आपले हित संबंध जोडले आहे. व आर्थिक लाभ मिळतील असा व्यवहार केला आहे. या प्रकरणाची वणी न्युज टुडेने सर्वत्र पोलखोल करताच भारतीय जनता पार्टीतील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या भुवया देखील उंचावल्या आहे. त्यामुळे बोदकुरवार यांची उमेदवारी तळ्यात मळ्यात सापडली आहे.

या भागातील माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर (भैया) यांची ओबीसी मतदारांवर मोठी पकड आहे. अहिर यांच्या शांत व संयमी स्वभावाने प्रत्येक व्यक्ती त्यांचा आदर ठेवत असतात. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभेत त्यांची भाजपने उमेदवारी कापून टाकल्याचा परिणाम मतदारांनी भाजपला दाखवून दिला आहे. तीच पुन:रावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी भैय्या यांनी काही उचित पक्ष हिताचे पावले उचलली आहे. याची कुणकुण लागताच येरवी भैयाच्या भेटी टाळणारे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी हंसराज अहिर यांची भेट घेवून उमेदवारी कायम ठेवण्यासाठी लोटांगण घातल्याची माहिती आहे. यावेळी भाजपचे जिल्हा पदाधिकारी दिनकर पावडे, वणी विधानसभा अध्यक्ष संजय पिंपळशेंडे, वणी तालुकाध्यक्ष गजानन विधाते आमदार महोदयासोबत उपस्थित असल्याची खात्रीलायक माहिती आहे.




