News Today
दिलीप भोयर
वणी :- तालुक्यातील नेरड (पू.) येथील एका शेतकऱ्यांचा शेतातील जंगली जनावरांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जिवंत वीज प्रवाहाचा झटका लागून शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील नेरड (पू.) शिवारात आज तारीख ११ रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे. विठ्ठल आनंदराव जूनगरी असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे.
मृतक शेतकरी हा जनावरांसाठी सोयाबीनचे कुटार आणायला मित्राच्या शेतात बैलबंडीने गेला असता कुटार बंडीत भरे पर्यंत बैल चरतील म्हणून सोडले असता बैल चरता चरता शेता शेजरी असलेल्या नाल्यकडे गेले. बैल दिसत नाही म्हणून सदर शेतकरी हे बैलाचा शोध घेण्यासाठी शेताच्या धुर्याकडे गेले असता त्या धुर्यावर जिवंत विजेचा प्रवाह असल्याने त्या प्रवाहाचा जोरदार झटका लागला त्यात जागीच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
दुपारी कुटार आणायला गेलेला शेतकरी सायंकाळ झाली तरी घरी परत न आल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता विठ्ठल जूनगरी यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आणि बघता बघता संपूर्ण परिसरात ही माहिती पसरली. वृत्त लीहेपर्यंत कोणतीही तक्रार पोलीसात दाखल झाली नव्हती.
Breaking News