हजारो शेतकरयांची उपस्थिती शेतकरी उत्पादक कंपनी तथा तक्रार समाधान केंद्र कार्यालयाचे उद्घाटन
चंद्रपूर:- शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं आणि भावच नाही मिळाला तर काय करणार. भाव पाहिजे खरेददारी पाहिजे आणि खरेददारी पासून भाव पण योग्य मिळाला पाहिजे. उत्पादनात वाढ झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेली काम याला यश आले आहे. कापसापासून हरभऱ्या पर्यंत चांगले भाव सरकारनी हमीभाव वाढविला. नरेंद्र जीवतोडे यांनी आपली कंपनी स्थापन केली. गावात जाऊन आपला माल शेतकऱ्यांनी विकला पाहिजे. भाव योग्य आला पाहिजे. आपल उत्पादनाच प्रोसेसिंग केल पाहिजे. व्यापाऱ्याच्या माध्यमातून उत्पादन विकण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन करून विका ही प्रधानमंत्र्यांची कल्पना नंदोरी गावात साकार होत आहे. असा विश्वास भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केला.
चंद्रपुर नागपुर महामार्गावरील शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ चंद्रपुरच्या कार्यालयाचे तथा शेतकरी तक्रार समाधान केंद्र कार्यालयाचे उद्घाटन भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता पार पडले.या शेतकरी उत्पादक कंपनी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतात तयार होणारे पिके थेट ग्राहकांपर्यंत विक्रीस उपलब्ध राहणार आहे. तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा या करीता स्टोरेज तयार करण्यात आले आहे. या कंपनीच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना आपल्या पिकांचा योग्य मोबदला मिळणार आहे. तर शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहे. मात्र प्रशासनाकडून, प्रशासकीय यंत्रणेकडून योग्य अमलबजावणी होत नसल्याने अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतच नाही. केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत 2000 रुपये देण्यात येतात. मात्र या योजनेचा लाभ अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही. काही शेतकऱ्यांची प्रकरणे त्रुटीत आहे. या सोबत अनेक योजनाचे प्रशासनाकडून शेतकऱ्यांचे समाधान होत नाही.
यामुळे शेतकऱ्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान होत असल्याने या शेतकरी उत्पादक कंपनीत शेतकऱ्यांसाठी शेतकरी समाधान तक्रार केंद्र कार्यालय उघडण्यात आल्याचे शेतकरी उत्पादक कंपनी चंद्रपुरचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी यावेळी सांगितले.
या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी भारत सरकारचे राष्ट्रीय मागासवर्गीस आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, डॉक्टर सागर वझे, किशोर टोंगे, रमेश राजूरकर, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप महाकुलकर, चंद्रकांत गुंडावार, संजय लोहकरे, नितिन मेहता, विजय वानखेडे, अफजल भाई, सुनील नामोजवर, पंचायत समिती माजी सभापती प्रवीण ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ते दादा झाडे, चंद्रपुर शेतकरी उत्पादक महासंघाचे पदाधिकारी बालाजी धोबे, सतीश बावणे, बळीराम डोंगरकर, संदीप एकरे, प्रकाश निब्रड गावातील सरपंच, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा महिला मंडळ सह वरोरा भद्रावती तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव व महिला उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याचे संचालन व आभार संदीप झाडे यांनी मानले.