News Today
वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रचंड खळबळ माजवणारी आणि कुणबी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न प्रकर्षाने चर्चेत आणणारी मोठी राजकीय घटना घडली आहे. भाजपचे जिल्हा महामंत्री आणि वणीतील युवकांचे लोकप्रिय नेते निखिल खाडे यांनी भाजपवर थेट ‘कुणबी समाजावरील व्देष’, ‘जातीयवाद’ आणि ‘उपयोग करून टाकण्याची प्रवृत्ती’ या गंभीर आरोपांचा भडिमार करून पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये विजयबाबू चोरडिया यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला असून, या हालचालीमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वात जबरदस्त अस्वस्थता पसरली आहे.
भाजपचा ‘जातीयवादी’ चेहरा उघड
निखिल खाडे यांनी भाजपमधील जातीय प्रवृत्तीवर रोखठोक आरोप करताना सांगितले –भाजपच्या कार्यालयात विधानसभा २०२४ च्या प्रचारादरम्यान कुणबी समाजाचा अवमान, अश्लील शिवीगाळ, आणि मानहानी करण्यात आली होती. या घटनेतील दोषींना पक्षाने संरक्षण दिले आणि उलट माझ्यावर सूडाची कारवाई केली. माझ्या उमेदवारीवर पराभूत माजी आमदार (मामा ) यांनी मुद्दाम कात्री लावली.
केवळ समाजाच्या इज्जतीसाठी आवाज उठवल्यानेच मला डावलले गेले.भाजपमध्ये कुणबी समाजाच्या नेतृत्वाला आणि प्रश्नांना दुय्यम वागणूक देऊन केवळ मतांसाठी वापरून टाकण्याचे धोरण आहे.
समाजातील असंतोषाचा उद्रेक — जनतेत दिसत आहे काळजी
विधानसभा प्रचारातील अपमानकारक घटनेने संपूर्ण कुणबी समाजात संतापाची लहर उसळली होती.
घटनेविषयी बोलल्याबद्दलच कार्यकर्त्यांवर सूडाने कारवाई, ही भाजपच्या ‘जातीयवादी’ आणि प्रतिगामी मानसिकतेची साक्ष आहे.पक्षाच्या ‘कोअर ग्रुप’मधील विल्हेवाट, आपल्या बाजूचे उमेदवार मुद्दाम डावलून पक्षशिस्तीच्या नावाखाली अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न.भाजपच्या विरोधात निर्माण होत असलेली जनमत लाट भाजपच्या ‘जातीच्या’ राजकारणाला औरंगाबाद, बुलढाणा, वर्धा, चंद्रपूर यवतमाळ, नागपूर आणि अमरावतीसारख्या जिल्ह्यांत देखील कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचे उदाहरणे नुकतेच दिसून आले होते.
अनेक ठिकाणी भाजपमध्ये होत असलेल्या प्रवेश—बाहेर पडण्याच्या घटनांनी, जिल्ह्यात महागठबंधनतील फूट व असंतोष चव्हाट्यावर आला आहे.
भाजप वरिष्ठांकडून तिकीट वाटपात वेळोवेळी होत असलेली दिशाभूल, गुप्त वाटाघाटी, आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे स्थानिक नेतृत्व नाराज आहे.
निवडणूक पूर्वी भाजपची उलगडती प्रतिमा व संघर्षभाजपमध्ये ७०% जागांचे उमेदवार निश्चित असूनही अनेक नेत्यांची, विशेषतः कुणबी, ओबीसी, स्थानिक समाजाच्या प्रतिनिधीत्वाची होणारी पायमल्ली ही पक्षाच्या सामाजिक समावेशकतेवर प्रश्नचिन्ह उभं करते.
शिंदे गटासारख्या मित्रपक्षांनीही भाजपच्या वावरण्यावर ताशेरे ओढले असून, आघाडी गटातील हालचालींमुळे भाजप अनेक ठिकाणी अडचणीत आहे.
भाजपच्या आजपर्यंतच्या ‘भागीदारीच्या’ वचनाला हरताळ फासत लोकसभेपासून विधानसभेपर्यंत समाजातील विशिष्ट घटकांना डावलण्याचे आरोप सतत जोर धरत आहेत.ही संपूर्ण घडामोड वणी तालुक्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यात भाजपच्या विरोधात तीव्र जनमत तयार करत आहे.
कुणबी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न, स्थानिक नेतृत्वाशी झालेला अन्याय आणि भाजपच्या ‘जातीयवादी’ धोरणांचा पर्दाफाश — या मुद्द्यांमुळे निवडणुकीपूर्वी भाजप समोर गंभीर आव्हान उभे राहिले असून, जनमताचा कल प्रगल्भ बदलाच्या दिशेने झुकण्याची शक्यता वर्तवली जाते.
निखिल खाडे हे प्रभाग ९ मधून आपली उमेदवारी अर्ज शिंदे गटाकडून दाखल करणार असून या उमेदवारीने भाजपला जोरदार झटका बसणार आहे. अशी चर्चा संपूर्ण शहरात चालू आहे.



