Friday, April 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणी विधानसभा क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाविकास आघाडीला पोषक वातावरण,  सर्व घटक...

वणी विधानसभा क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाविकास आघाडीला पोषक वातावरण,  सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज

News Today

प्रतिनिधी – वणीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांकडे वणी विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीला सध्या जनतेचा स्पष्ट पाठिंबा मिळत असल्याची राजकीय चर्चा आहे. वातावरण आघाडीला पोषक असूनही, औपचारिक बैठक अद्याप झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी सर्व घटक पक्षातील नेत्यांनी लवकरच एकत्रित येण्याची गरज निर्माण झाली आहे.

पूर्वीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीच्या एकजुटीचा फायदा काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि  शिवसेना (उबाठा) आमदार संजय देरकर यांच्या विजयानं स्पष्टपणे दिसून आला होता. त्या यशाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकत्रित लढा दिल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आहे.

वणी विभागात एकूण ९ जिल्हा परिषद क्षेत्रे आणि १८ पंचायत समिती गण आहेत. यामध्ये वणी तालुक्यात ५ जिल्हा परिषद व १० पंचायत समिती क्षेत्रे, तर मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यांत प्रत्येकी २ जिल्हा परिषद व ४ पंचायत समिती गणांचा समावेश आहे. त्यामुळे या भागातील सत्ता समीकरणे ठरविण्यात हीच निवडणूक निर्णायक ठरणार आहे.

दरम्यान, शेतकरी वर्गात वाढत्या असंतोषामुळे राजकीय समीकरणे आणखी बदलताना दिसत आहेत. अपुऱ्या दरांमुळे आणि शासकीय निर्णयांमुळे अस्वस्थ झालेल्या ग्रामीण मतदारवर्गात “शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारला धडा शिकवायचा” अशी भावना वाढीस लागली आहे.

त्याचा थेट लाभ महाविकास आघाडीला होऊ शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.सध्या तिन्ही घटक पक्षांचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी अंतर्गत चर्चेत व्यस्त आहेत.

औपचारिक बैठक काही दिवसांत होण्याची शक्यता असून, ती झाल्यानंतर उमेदवारांच्या निवडीबाबत एकमत साधले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.जनतेमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि विरोधकांविरोधातील असंतोष लक्षात घेता, एकत्रित लढा दिल्यास या भागात महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter