Thursday, April 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedतहसिल कार्यालयाजवळ आठ जणांची एकास रक्तरंजित मारहाण – इसम मृत्यूशी झुंजत, आरोपी...

तहसिल कार्यालयाजवळ आठ जणांची एकास रक्तरंजित मारहाण – इसम मृत्यूशी झुंजत, आरोपी अटकेत,

News Today  (दिलीप भोयर)

वणी (प्रतिनिधी) : वणी शहरातील तहसिल कार्यालयाजवळील जी.आर. नास्ता सेंटर समोर काल मध्यरात्री (दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता) झालेल्या प्राणघातक हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पानठेल्यावर गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून तब्बल आठ जणांनी संगनमत करून एका इसमावर जीवघेणा हल्ला केला.

घटनेचा तपशील

पीडित अंकुश मोगरे यांचा आरोपींसोबत वाद झाला. त्यातच त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान आरोपींनी हातातील काठ्या व लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर, पाठीवर, तसेच हातापायांवर मारहाण केली. जखमी अवस्थेत अंकुश मोगरे पोलिस स्टेशनकडे जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून जी.आर. नास्ता सेंटर समोरील सिमेंट रोडवर पाडले. या ठिकाणी आरोपी विशाल चौहान याने अंकुश यांच्या डोक्यावर वारंवार काठीचे प्रहार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

फिर्याद आणि आरोपी

या घटनेबाबत भोलेश्वर नारायण ताराचंद (वय ४०, रा. सेवानगर, वणी, व्यवसाय – नोकरी, नगर परिषद वणी) यांनी वणी पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

या प्रकरणी आरोपी पुढीलप्रमाणे आहेत : १) विलास चौहाण २) विशाल चौहाण ३) सूर्यभान चौहाण ४) विरसिंग उर्फ विरु लीवारे ५) दुर्गेश उर्फ सोनू चौहाण ६ ) दोन अनोळखी, एक विधी संघर्ष बालक असे आरोपी आहेत.

गुन्हा नोंद व तपास

फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भा.दं.वि. कलम १०९, १८९(१), १८९(२), १८९(३), १८९(४), १९०, १९१(१), १९१(२), १९१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली असून पुढील तपास  पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनी सुदाम आसोरे आदी करीत आहे. 

परिसरात भीतीचे वातावरण

पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर अशी घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. शहरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाकडून तातडीने सुरक्षा वाढवावी, अशी मागणी होत आहे.

बघा इंस्टाग्रामवर घटनेचा व्हिडिओ 👇 https://www.instagram.com/reel/DPO9yi2CJH6/?igsh=MXJ4Yzg2Njg4cm5pOA==

बघा फेसबुकवरील घटनेचा थरारक व्हिडिओ 👇

https://www.facebook.com/share/r/1BaJ2ZmqkE/

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter