News Today
वणी (जि. यवतमाळ), ता. २१ जून: कोरपना कोळशी घाटावरून दररोज मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून, यात प्रोग्लेम मशीनचा सर्रास वापर होत आहे. महसूल विभागाच्या आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू तस्करीला खुलेआम उधाण आले आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि राजकीय आशीर्वादामुळे ही यंत्रणा कुचकामी झाल्याचे चित्र आहे. वणी परिसरातून नाशिक, अकोला, अमरावती व आदिलाबादपर्यंत वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. अनेक वाहनांमध्ये GPRS यंत्रणा नसल्यामुळे प्रशासनाला त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे शक्य होत नाही. विशेष म्हणजे एका रॉयल्टीवर ८ ते १० ट्रिप्स होत असल्यामुळे महसूल विभागाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.

चारगाव चौकी व वरोरा मार्गावरील संविधान चौकात नाकाबंदीची गरज
शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चारगाव चौकी व वणी शहरातील संविधान चौकापर्यंत नाकाबंदी नसेल, तर ही वाहतूक अडवणे अशक्य आहे. या मार्गावरून अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या वेळी प्रचंड प्रमाणात होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे या मार्गावर २४ तास नाकाबंदीसह पोलीस बंदोबस्त ठेवणे तातडीचे झाले आहे.
पर्यावरणीय ऱ्हास आणि नागरिकांचा आक्रोश
नदीपात्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून पर्यावरणाचा तोल ढासळत आहे. याविरुद्ध स्थानिक पर्यावरणप्रेमी संघटना आणि नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, तात्काळ नाकाबंदी व कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सरकारपुढे प्रश्न: कारवाई की कोळशी घाट?
वाळू माफियांच्या प्रभावाखाली प्रशासन गप्प बसणार का, की जनहितासाठी ठोस पावले उचलणार? हा प्रश्न आता जनतेसमोर उभा आहे. जर प्रशासनाने आता कडक कारवाई केली नाही, तर येत्या काळात याचे गंभीर परिणाम निसर्गावरच नव्हे तर प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरही होणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील नदी घाटातून उपसा करणारे कंत्राट हे डबल इंजिन सत्ताधारी पक्षातील असून घुगुस जि. चंद्रपूर येथील एक विवेकी मास्तर या वाळू तस्करीतील मोडक्या असल्याचे बोलल्या जात आहे. हा मास्तर भाजपशी संलग्न असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ” ना खाउंगा ना खाणे दुंगा ” म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीच्या तोंडाला शेण फासत असल्याची चर्चा होत आहे.



