Sunday, December 14, 2025
Google search engine
HomeUncategorizedवणी न.प. — प्रभाग क्रमांक ८ ब : राजू इंगोले यांच्या उमेदवारीला...

वणी न.प. — प्रभाग क्रमांक ८ ब : राजू इंगोले यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद; कुणालबाबू चोरडिया उमेश पोतदार यांच्या नेतृत्वात प्रचाराला गती

News Today 

वणी :  नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८बमध्ये प्रचाराला जोरदार उधाण आले असून शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार राजू इंगोले यांची उमेदवारी विशेष चर्चेत आहे. तरुण, उत्साही आणि सर्वसामान्यांच्या मदतीला तत्पर धावून जाणारा चेहरा म्हणून राजू इंगोले यांनी अल्पावधीतच मतदारांमध्ये भक्कम स्थान निर्माण केले आहे.

या संपूर्ण प्रचार मोहिमेचे नेतृत्व विजय बाबू चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचारात शिस्त, नियोजन आणि प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा ध्यास दिसून येतो. यासोबतच कुणाल चोरडिया आणि उमेश पोतदार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते दिवस-रात्र परिश्रम घेत असून, गल्लोगल्ली फिरत मतदारांशी संवाद साधत आहेत. कार्यकर्त्यांच्या या व्यापक संपर्क मोहिमेमुळे राजू इंगोले यांच्या प्रचाराला मोठी उभारी मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांत प्रभागातील विविध समस्या, विकासकामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यावर इंगोले यांनी मतदारांशी थेट चर्चा केली. युवा उमेदवार म्हणून त्यांच्याकडून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची अपेक्षा व्यक्त करणारे मतदारही मोठ्या प्रमाणात दिसले.

उद्या, २ डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून प्रभाग क्रमांक ८बमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी मतदारांच्या चर्चेत राजू इंगोले हे नाव ठळकपणे पुढे येत असल्याचे चित्र दिसून येते.

निकाल काहीही असो, मात्र सध्या प्रभाग ८बमध्ये राजू इंगोले, विजय बाबू चोरडिया यांचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या अफाट मेहनतीमुळे निवडणुकीची हवा आणखी रंगतदार बनली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular

Visitor Counter