News Today
पंढरपूर :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे सदस्य वणी विधानसभा क्षेत्र जि. यवतमाळचे आमदार संजय देरकर यांनी आज तारीख ११एप्रिल रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्राच कुलदैवतं भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतले व शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी दे रे पांडुरंगा असे साकडे पंढरपुरात येऊन आमदार संजय देरकर यांनी पांडुरंगाच्या चरणी दिले.
निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती देवू, लाडक्या बहिणींना २१०० रुपये मासिक वेतन देऊ, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ अशी अनेक वचने यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. सत्तेत आल्यानंतर या सरकाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले आहे. शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला आहे. शेतकऱ्यांनी सर्व शेतमाल विकल्या नंतर भाव वाढ केल्या जात आहे. राज्यातली महायुती आणि शेतकऱ्यांची अधोगती अशी अवस्था राज्याची झाली आहे. महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विचार झाला पाहिजे. यासाठी या सरकारला सद्बुद्धी दे रे पांडुरंगा असे साकडे आमदार संजय देरकर यांनी पांडुरंगाला घातले.
यावेळी विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य तथा शिवसेनेचे (उबाठा) सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, श्रीगुरुदेव सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप भोयर, इंजि. कुंडलिक ठावरी, राहुल ठाकरे, मनीष बत्रा, कुणाल मेकलवार , प्रीतम पेंदोर, पोलिस कॉन्स्टेबल निलेश झाडे आदी मान्यवर उपस्थित होते.