News Today
वणी : – अखिल कुणबी महासंघाच्या वतीने दिनांक १५ रोजी गोरक्षण जवळील ए. एस. लॉन येथे अखिल कुणबी महासंघाची वणी तालुका अध्यक्ष म्हणून गणेश आसुटकर तर सचिव म्हणून पवन बुऱ्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या बैठकीला यावेळी अखिल कुणबी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डि. के. आरीकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर , महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष आशिष येडांगे, जिल्हा अध्यक्ष राजेश पहापळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा म्हणून संध्या लोडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी मुरलीधर भोयर व नरेश मुरासकार, गजानन पोटे , तर वणी तालुका अध्यक्षपदी गणेश आसुटकार, उपाध्यक्ष पदी विलास आवारी, हरी आसुटकार, दत्ता बोबडे, सतीश लडके, कार्यध्यक्ष पदी हरिदास काकडे, सचिव पदी पवन बुऱ्हान, सहसचिव पदी दशरथ पायघन, संघटक पदी योगेश आवारी, प्रफुल उपरे तर वणी शहराध्यक्षपदी बालाजी भेदोडकार, उपाध्यक्ष पदी आशिष दुमोरे, प्रशांत बोबडे, सचिव पदी संतोष सिदुरकार, सहसचिवपदी गणेश पारोधी, संघटक पदी गजानन काकडे यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. आरिकर यांनी केली असता सर्व समाज बांधवांकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.




