News Today
वणी :- येथून जवळच असलेल्या झरी तालुक्यातील मुकुटबन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभागृहात काल ता. ३१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता संपन्न झालेल्या वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या जनता दरबारात विभागातील कोळसा,सिमेंट कंपन्यांमुळे निर्माण झालेल्या तमाम समस्येला जनतेनी वाचा फुडली आहे. यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासन आमदार संजय देरकर यांनी जनतेला दिले आहे.
झरी जामनी तालुक्यातील मुकुटबन परिसरातील आरसीसीपीएल (RCCPL) व डोलोमाईट आणि लाईम स्टोन कंपनीच्या कार्यक्षमतेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अनेक अडी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय शोधण्यासाठी नुकतेच आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली एक जनता दरबार आयोजित करण्यात आला, ज्यात शेतकऱ्यांनी आपली समस्यांमधून आपले दु:ख व्यक्त केले. या दरबारात आरसीसीपीएल कंपनीच्या ब्लास्टिंगमुळे पिंप्रड वाडी गावातील लोकांना मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला.
जनता दरबारामध्ये शेतकऱ्यांनी सांगितले की, सदर कंपनीने पिंप्रड वाडी या गावाला दत्तक घेतले असतानाही, गावाच्या विकासासाठी कंपनीने एकही CSR (Corporate Social Responsibility) फंड दिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांना मदतीची अत्यंत आवश्यकता आहे. पाऊस, सांडपाणी, आणि प्रदूषणामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती आणि पाणी पुरवठ्याला हानी पोहोचली आहे.
आरसीसीपीएल कंपनीच्या कार्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे प्रदूषण वाढले असून यामुळे जनावरांच्या चराईचा प्रश्न ऐरणीवर आहे. भूजल पातळी घटत चालली असून पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांच्या शेतीला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. तरीही, कंपनीकडून या समस्यांच्या निराकरणासाठी कोणताही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. यावर्षी या समस्यांना तोंड देणाऱ्यांना कंपनीने एकही मदत केली नाही. पिण्याच्या पाणीप्रश्नाबाबत सुद्धा कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही अशी ओरड जनता करीत होते.
मागील १० वर्षात पहिल्यांदाच जनतेच्या समस्येवर आमदार संजय देरकर यांनी जनता दरबार आयोजित केल्याने कंपनीग्रस्त शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित महिला व तरुणांनी मनमोकळे पणाने आपल्या समस्या मांडल्याने आमदार संजय दरेकर यांच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक देखील केले होते.
जनता दरबारात आमदार संजय देरकर यांना मिळालेल्या सर्व तक्रारीची प्रामुख्याने दाखल घेवून आगामी काळात या समस्यांवर कार्यवाही केली जाईल आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचा संरक्षण करण्यासाठी संबंधित कंपन्यांना ठोस पावले उचलण्यास प्रवृत्त केले जाईल. असे आमदार महोदयांनी याच दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांच्या हितासाठी सीएसआर फंडचा उपयोग, प्रदूषण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, आणि शेतकरी-समूहांच्या सहकार्याने ठोस उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजू येल्टीवार, कृ. ऊ.बा.स.चे सभापती राजू कासावार, झरि न. प. च्या नगराध्यक्षा सौ. ज्योती बिजगुनवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, दीपक कोकास्, जिल्हा सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे, निलेश येल्टीवार, भूमारेड्डी बाजनलावार,सतीश आदेवार, समीर लेनगुडे, डॉ. जगन जुनगरी, विवेक ठाकरे, संदीप विंचू , भगवान मोहिते, सुधीर थेरे, शरद ठाकरे, राजू तुरणकर, नगरसेविका सौ रजनी नैताम, सौ शीला चौधरी नगरसेवक संतोषमंचलवार, नगरसेविका सौ सुजाता अनमूलवार,सौ सीमा मंडाले, संगीता कनाके आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन व आभार नेताजी पारखी यांनी केले.