News Today
वणी :- मागिल ८ दिवसापासून पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समोर सूरू असलेले आंदोलन . त्यात आदिवासी मुला/ मुली यांचे त्यांच्या मूलभूत हक्कासाठी लढत आहे. त्यांच्या प्रमुखं मागण्या महाराष्ट्र शासनाच्या वार्षिक महागाई दरानुसार प्रत्येकवर्षी आदिवासी विकास विभागामार्फत येणाऱ्या जिल्हास्तरीय मुला – मुलींना वस्तीगृहामध्ये लागु असलेल्या DBT या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी वर्षी महागाई दरानुसार वाढ करण्यात यावी यासारख्या प्रश्नाबाबत आंदोलन सूरू आहे. या आंदोलनस्थळी वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी भेट घेतली.
त्या वेळी आमदार संजय देरकर यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून त्यांची समस्या जाणुन घेतल्या व लवकरात लवकर संबंधीत विभागाला भेटून न्याय मिळवून देऊ असे आश्र्वासन दिले. त्यावेळीं प्रकल्प अधिकारी सुहास गाडे, य. जि. म. बॅक संचालक राजीव येल्टीवार , मिथुन सोयांम, राहुल दांडेकर, बाळु दुधखुळे , संतोष जंगीलवार, गौरव पंधरे, बंडू आळे, गोपाल मडावी, संतोष कोहळे, गौरव भूषेवार उपस्थिती होते.