News Today
यवतमाळ:- येथील रेमंड युको डेनिम प्रा.ली. व निस्वार्थ फाउंडेशन यांचे संयुक्तरित्या लोहरा येथील एम.आय. डी.सी. येथे भव्य रक्तदान शिबिर ता. १८ रोजी आयोजित करण्यात आले होते.
शासकीय रक्तपेढी मध्ये मागील अनेक दिवसापसून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्णालयात भर्ती असणाऱ्या रुग्णांना रक्त मिळणे खूप कठीण झाले होते. थालेसेमिया, सिकलसेल, प्रसुती तसेच अपघातग्रस्त अशा अनेक रूग्णांना रक्ता अभावी उपचार घेणे अवघड झाले होते.
निःस्वार्थ सेवा फाऊंडेशन यवतमाळ या रुग्णांना रक्त मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. निस्वार्थ सेवा फाऊंडेशन यांनी रेमंड युको डेनिम प्रा. ली. या कंपनीच्या अधिकाऱ्यांना रक्तदान शिबिराचे आयोजन करणे करीता आवाहन केलं असता, त्यांनी लगेचच रक्तदान शिबिराचे आयोजन करणे करीता परवानगी दिली त्याला रेमंड मधील अधिकारी व कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, सदर शिबिरामध्ये रक्तदात्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून 86 रक्त दात्यांनी रक्तदान केले.
सदर शिबिराचे उद्घाटन श्री. नितीन श्रीवास्तव सर, श्री. संतोष चांडक सर यांचे हस्ते करण्यात आले. तर शिबिर यशस्वीरीत्या पार पाडणे करीता रेमंड युको डेनिम प्रा.ली कंपनी तर्फे श्री. नितीन श्रीवास्तव सर, श्री पातुरकर सर, श्री. संतोष चांडक सर, जयविर राठोड, मयूर काळे, निलेश कळसकर, अझर खान, श्यान इंगळे, निलेश कोरे आणि अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. तसेच निस्वार्थ सेवा फाऊंडेशन तर्फे अनिकेत नवरे, परशुराम कडू, निलेश जगताप, आस्तेश गावंडे, यांनी परिश्रम घेतले. शासकीय रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने व जबाबदारीने शिबिर यशस्वीरीत्या पार पाडणे करीता सहकार्य केले. त्यामुळें शासकीय रक्तपेढीत रक्त तुटवडा काहीसा भरून निघण्यास मदत झाली.
या महा रक्तदान शिबिरामध्ये सहभागी रक्तंदात्यांना प्रोत्साहन पर भेट देणे करीता *स्व. श्रीमती रक्षा विजय कुमार बुंदेला यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजय कुमार बुंदेला* यांचे कडून टिफीन बॉक्स देण्यात आले. शासकीय रक्तपेढी तर्फे डॉ.विकास भरकाडे, समाजसेवा अधीक्षक आशिष दहापुते सर, आशिष खडसे सर, मोहन तडवेकर, अतुल राऊत, अनिकेत राठोड, अनिकेत चव्हाण, अंजली जाधव , पल्लवी राठोड, स्नेहल शिवनकर, दीक्षा राऊत या सर्व चमूने सहकार्य केले.