सा. बां. विभागाची मान्यता नसताना वर्क ऑर्डर झाली कशी
News Today
दिलीप भोयर
वणी :- वृक्ष लागवडीची कोणतीही रीतसर परवानगी नसताना येथील मुख्य मार्गावरील दुभाजकाच्या मधोमध वृक्ष लावलेल्याने चक्क आचार सहितेचा झाला असून या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का ? तसेच वृक्ष लागवडी करण्यासाठी जागेची उपलब्धता नसताना त्या कामाची वर्क ऑर्डर केली कशी असा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने नगर परिषदेच्या कामकाजाची चौकशी करण्याची गरज प्रशासनासमोर निर्माण झाली आहे.
वणी शहरातील टिळक चौक ते हॉटेल नंदिनी, टिळक चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या मधोमध वृक्ष लागवडी आणि तीन वर्ष संगोपनाची निविदा नगर परिषद यांचे कडून काढण्यात आली व तारीख ११ ऑक्टोंबर रोजी वर्क ऑर्डर देखील पास करण्यात आली. सदर निविदा काढण्याचे अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियमाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शन प्रणालीने रीतसर परवानगी घेणे अनिवार्य आहे.
सा. बां. विभागाची कोणतीही परवानगी न घेता नगर परिषदेकडून तब्बल १ कोटी ३३ लाखाची निविदा प्रकाशित करून त्यांची वर्क ऑर्डर देखील संबंधित कंत्राटदाराला देण्यात आली. कोणतीही मान्यता नसताना येवढ्या मोठ्या निधीची वर्क ऑर्डर ही कोणत्या नियमाच्या आधारे काढली याची कोणतीही कायदेशीर माहिती नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडे नाही.
जेव्हा की साधा रस्ता जरी एखाद्या शेतकऱ्यांनी परवानगी न घेता सिंचनाच्या सोयी करिता खोदला तर त्यांचेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करायला हे प्रशासन प्रामुख्याने सामोरे जावून गुन्हे नोंद करीत असतात मग आता कोणतीही परवानगी नसताना नागरिकांना समस्या निर्माण करणारे वृक्ष लागवड केली तेही आचार संहिता चालू असताना ही गंभीर बाब नाही का? मग यांचेवर गुन्हे नोंदविण्यासाठी प्रशासन का धजवल्या जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वणी शहर प्रदूषणाने ग्रासलेले आहे. इथे लावले तेवढे वृक्ष कमीच पडतात. वृक्ष लागवड ही पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. परंतु कोणते वृक्ष कुठ लावायला पाहिजे जाची जाणीव असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु नगर परिषदेकडून करोडो रुपये खर्च करून या वृक्षांचे संगोपन करणे म्हणून विना परवानगीने वृक्ष लागवड करणे हा गंभीर गुन्हा आहे.
खरच नगर परिषदेला वृक्ष लागवड करून शहराचे सौंदर्य वाढायचे असते ते शहरात वृक्ष संवर्धन समितीने या अगोदर शेकडे वृक्ष लागवड करून त्यांचे मोफत संगोपन केले आहे. ते वृक्ष आजही रस्त्याच्या दुबाजुंनी हिरवळ थंडगार सावली देत आहे. हेच काम वृक्ष संवर्धन समितीकडे दिले असते तर येवढ्या निधीत संपूर्ण वणी शहर हिरवेगार करून टाकले असते. आणि त्यांचे संगोपन देखील उत्तम प्रकारे केले असते अशी चर्चा शहरात सुरू आहे.
वृक्ष लागवड करायचीच होती तर आपल्या शहराजवळ पांढरकवडा, वरोरा, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी रस्ता दुभाजकावर सौंदर्य निर्माण करणारी आनंददायी झाडे लावलेली आहे. ती फुलांची झाडे निरागस सौंदर्य फुलवीत आहे. मग येथील तत्कालीन लोकप्रतिनिधी अधिकारी यांना का दिसली नाही. सौंदर्यदृष्टी व लोकांचा आनंद कशात आहे हे न ओळखणारे राज्यकर्ते असले की रस्ता दुभाजकावर नागरिकांना त्रासदायक झाडे लावली जातील आणि सरकारी म्हणजेच जनतेच्या पैशाची भ्रष्टाचार करून विल्हेवाट लावल्या जाईल ही बाब अतिशय गंभीर आहे.
शहरातील संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी वृक्ष संवर्धन समितीने कोणती झाडे लावली आणि डिव्हायडरच्या मधोमध कोणते वृक्ष लावायला पाहिजे याची साधी कल्पना नसणारे बेमुर्वत पैशाची उधळपट्टी करणारे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची चौकशी करून त्यांचेवर गुन्हे दाखल करून पैसे वसूल करणे गरजेचे आहे. ही त्रासदायक झाडे उपडून नवीन फुलझाडे लावण्याकरिता समाजातील जागरूक नागरिकांनी रस्त्यावर येण्याची गरज आहे.
याच रस्त्यावर रेल्वे स्टेशन बाजार समिती दत्त मंदिर जगनाथ बाबा मंदिर, लोकमान्य टिळक महाविद्यालय या महत्वपूर्ण संस्था असून मुख्य बाजारात जाण्याचा आणि इतर शहरात जन्यचासाठी हा एकच मार्ग आहे. इथे विद्यार्थी भाविक भक्त शेतकरी शेतमजूर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. लावलेली झाड काटेरी टोकदार प्रवाशांना त्रासदायक होईल हे भ्रष्टाचार करणाऱ्यांना साधे भान सुद्धा राहिले नाही. या रस्त्यावरू सर्वांच्या कुटुंबातील लोक जाणार त्यांनाही त्रास होऊ शकते याची कल्पना नाही. अशा जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या मुर्दाडाची भर चौकात धिंड काढणे काळाची गरज आहे.
जनतेच्या पैसा सरकारी तिजोरी खर्च करून जीनागरिकांना त्रासदायक होणारी वृक्ष लागवडीला विकास मनाचे की भकास . वारे करते धरते वारे विकास एकदम छान लोकप्रतिनिधी व अधिकारी कंत्राटदाराच्या साहाय्याने मालामाल आणि मालक जनतेचे होते बेहाल. अश्या निर्लज्ज लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून येण्याची अपेक्षा करावी ही लाजिरवाणी बाब आहे. पराभव आला म्हणून रडणारे जनतेच्या पैश्याची उधळपट्टी करणार आणि पराभवाचे खापर इतरांवर फोडणार अश्या भ्रष्ट लोकांवर गुन्हे नोंद करायलाच पाहिजे अशी मागणी होत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कोणते वृक्ष लागवड करायची मंजुरात घेतली – मुख्याधिकारी सचिन गाडे
रस्ता दुभाजकावर मधोमध लावण्यात आलेले वृक्ष संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून तांत्रिक मांजुरात घेतल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी दिली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी नसताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला सरळ सरळ परवानगी देता येत का आणि काटेरी टोकदार वृक्ष लागवडीसाठी गाईडलाईंस करता येत का ही चौकशीची बाब निर्माण झाली आहे.