सां. बा. विभागाची परवानगीच नाही, १.३३ कोटी खर्च कशासाठी
News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील मुख्य मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या बोगस काँक्रिट रस्ता बांधकामातील दुभाजकाच्या मधोमध लावण्यात आलेले वृक्ष हे सौंदर्यासाठी आहे की समस्या निर्माण करण्यासाठी आहे. असा प्रश्न उपस्थित झाला असून या वृक्ष लागवडीसाठी लागणारी गाईडलाइंस बनवली तरी कोणी यावर आता मोठी शंका निर्माण होऊन जवळपास १.३३ कोटी रुपयाच्या खर्चाची रीतसर चौकशी करण्याची वेळ निर्माण झाली आहे.
चिखलगाव रेल्वे चौपाटी ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत नव्याने बोगस पद्धतीने बांधण्यात आलेला काँक्रिट रस्ता हा अगोदर पासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. रस्ता बांधकाम करणारा कंत्राटदार याने हा रस्ता न बांधता वणीतील आर. व्ही. उंबरकर कन्स्ट्रक्शन कंपनीने तत्कालीन एका माजी लोकप्रतिनिधींच्या (मामा) सहकार्याने नित्कृष्ट दर्जाचा बांधकाम केला आहे. या रस्त्यावरील चौकशीची कारवाई राजकीय हस्तक्षेपामुळे सत्तेचा दूर उपयोग करून केराच्या टोपलीत टाकली आहे.
याच रस्त्याच्या दुभाजकाच्या आता नगर परिषदेकडून मोजके वृक्ष लागवड केल्याची माहिती आहे. खरे तर या दुभाजकाच्या मधोमध मार्गाचे सौंदर्य खुलण्यासाठी वृक्षांची लागवड असते. त्यात बोगनवेल, तिकोमा, कनेर, जास्वंद, चमेली, अनंता इत्यादी शोभिवंत फुल वृक्ष लावने अनिवार्य आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्या फुलांपासून आनंद होतो सोबतच शहराच्या सौंदर्यात भर पडते. प्रवाशामध्ये आनंददायी सकारात्मकता या फुलझाडामुळे निर्माण होते. तसेच रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने जेणाऱ्या वाहनाचा लाईटचा प्रकाश जाणाऱ्या वाहनावरीच चालकांना विचलित करू नये. व कोणताही अपघात घडू नये. यासाठी ही वृक्ष लागवड असते.
वृक्ष लागवडीच्या या मूळ उद्देशाला डावलून नगर परिषदेने या दुभाजकाच्या मधोमध काटेरी टोकदार फांद्याचे वृक्ष लावले आहे. ज्या वृक्षांच्या फांद्या नारळाच्या फांद्या सारखे टोकदार असतात असे अनेक वृक्ष लागवत केली आहे. हे वृक्ष लांब वाढतात व त्यांच्या फांद्या २५ ते ३० फूट गोलाकार घेतात तर काही वृक्ष काटेरी आहेत. ज्या वृक्षापासून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रवास करताना त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होवू शकतो.
रस्त्याच्या दुभाजावरील मध्यभाग हा रस्त्याचा असल्याने तो अत्यंत कडक असतो कारण मुरूम , डांबर, टाकलेला असतो त्यामुळे लावण्यात आलेल्या वृक्षाची मुळे खोलवर जावू शकत नाही. त्यांना पाहिजे तशी मजबुती येत नाही. लावण्यात आलेली ही वृक्ष उंच वाढणारी आहे. त्यामुळे जोरदार हवा पाण्यात ही वृक्ष कोसळण्याची देखील दाट शक्यता आहे. अश्यावेळी एखादे वृक्ष जर रस्त्यावरील मार्ग भ्रमण करीत असलेल्या वाहनावर कोसळले आणि यात जीवित हाणी झाल्यास या घटनेला नेमके जबाबदार कोणाला धरायचे अशी वेळ निर्माण झाली आहे.
रस्ता दुभाजक असल्याने वाहन चालविणारे सर्व नागरिक हे त्या दुभाजकाच्या जवळूनच अहन चलविणार आहे. यात एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याला काटेरी झाडाच्या किंव्हा टोकदार फांदीची इजा झाली, किंव्हा त्या फांद्यांमुळे एखादा अपघातात आणि अपंगत्व आल किंव्हा जीव गमावावा लागला तर या दुर्दैवी घटनेची जबाबदारी कोणाची? म्हणून या वृक्ष लागवडीच्या गाईड लाइन्स कोणत्या तज्ज्ञांनी बनवली आहे. की कोणाच्या दबावात येवून मनमनी कारभार केला आहे. यासाठी चौकशी होणे गरजेचे झाले आहे.
या मार्गाने दररोज लाखो वाहने चालल्या जात आहे. इजा होणारे वृक्ष व या कामात होत असलेली अनियमितता यासाठी नगर परिषद व संबधित विभागाकडून कोणत्या उपाय योजना आखल्या गेल्या आहेत का ? असेल तर त्यांची अमलबजवणी कोणत्या पद्धतीची आहे. या सर्व गोष्टींची खातर जमा केली आहे का? यावर चिंतनाची गरज आहे.
शासनाचा निधी मिळाला आणि तो कुठंही खर्च केला म्हणजे विकास म्हणता येईल का ? शासनाचा निधी म्हणजे तो जनतेचा पैसा आहे. तो पैसा जनतेच्या विकसित धोरणावर त्यांच्या सौरक्षण साधून खर्च करायचा आहे. केवळ कमिशन खोरीसाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी जर मनमानी पद्धतीने खर्ची खालून जनतेला वेठीस धरत असेल किंव्हा त्यांना समस्येत ढकलत असेल तर हा एक संगनमताने केलेला गंभीर गुन्हा आहे. हा गुन्हा करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक नसते. त्यामुळे या वृक्ष लागवतटीची उच्च स्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे.
वृक्ष लागवड करण्याची परवानगीच नाही – इंजी. आसुटकर
शहरातील मुख्य मार्ग क्र. ३१५ हा राज्य मार्ग असून हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत आहे. या मार्गावर लावण्यात आलेल्या वृक्षाची कोणतीही रीतसर परवानगी या विभागाकडून घेतली नाही अशी माहिती सां.बा.विभागाचे उपविभागीय अभियंते आसुटकर यांनी दिली आहे. त्यामुळे ही वृक्ष लागवड चौकशीच्या घेऱ्यात येईल का याकडे लक्ष लागले आहे.