News Today
दिलीप भोयर
वणी :- येथील भाजपचे माजी आ. बोदकुरवार यांनी निवडणुकीतील संपन्न झालेल्या प्रचार कार्यालय परिसरात ता. ४ नोव्हेंबर रोजी कुणबी समाजा बद्दल घटलेल्या त्या वक्तव्यासंदर्भात प्रथम हा प्रकार घडलाच नाही अशी पत्रकार परिषद तारीख ५ नोव्हेंबर रोजी घेतली होती. तर काल ता. १ डिसेंबर रोजी आणखी एक पत्रकार परिषदेत चक्क त्या घटनेत भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेद्र बोर्डे यांनी मारहाण केल्याची कबुली दिल्याने बोदकुरवार यांची दुतोंडी भूमिका समाजासमोर आल्याने कुणबी समाजात रोष पसरत आहे. व बोदकुरवार हे आणखी अडचणीत येण्याची शक्यता वाढली आहे.
तत्कालीन भाजपच्या व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सुधीर साळी या समाज कंठकाने संपन्न झालेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मधील भाजपा प्रचार कार्यालयाच्या परिसरात कुणबी समाजाबद्दल अक्षेपार्थ वक्तव्य करताच संपूर्ण कुणबी समाजाच्या तळपायाची आग मस्तकात पोहचली होती.
तारीख ५ नोव्हेंबर रोजी बोदकुरवार यांनी घेतलेली पत्रकार परिषदेतील वृत्ताची लिंक उघडा आणि बघा
https://youtu.be/w-oBXqX2R1o?si=DyXNpZP_bSSCt-X5
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी कार्यालयात येवून मजी आ. बोदकुरवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज (भैया) अहिर यांच्या समक्ष समाज कंठक सुधीर साळी याला चांगला चोप दिल्याने ही वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली होती. आता ही घटना घडल्याची कबुली माजी आ. बोदकुरवार यांनी जाहीर पत्रपरिषदेत दिली आहे.
ता. ४ नोव्हे. रोजी घडलेल्या त्या घटनेची सोशल मीडिया व काही वृत्त वाहिन्यांनी दखल घेवून वृत्त प्रकाशित होताच भाजपच्या पायाखालची जमीन सरकली व माजी आ. बोदकुरवार यांनी त्याच प्रचार कार्यालयात तारीख ५ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अती तातळीची पत्रकार परिषद बोलवून ती घटना घडली नाही असे उपस्थित पत्रकारांना सांगण्यात आले. तारेंद्र बोर्डे यांनी कुणाला मारहाण केली नाही. त्यांनी फक्त ते भांडण सोडवले होते. अशी माहिती दिली होती.
परंतु कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी करणाऱ्यांची त्यावेळी त्यांनी अप्रत्यक्ष पाठ राखण केली होती. पण या घटनेची सत्यता सर्व समाजाला कळल्याने गावोगावी बोदकुरवारांना प्रचारादरम्यान या घटने संदर्भात कुणबी समाजाच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत होते. तर काही ठिकाणी गावातही प्रचार करू दिल्या जात नव्हते. तर काही गावात निवडणूक प्रचाराचे फलक देखील फाडण्यात आले होते.
या निवडणुकीत बोदकुरवारांना शेवटी पराभव पत्करावा लागला आणि त्यांनी या पराभवाचे खापर जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या नावाची फोडायला सुरवात केली. तारेंद्र बोर्डे हे एक कुणबी समाजातील उभरत नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वात केळापूर आणि राळेगाव विधानसभेतील २ आमदार विजय झाले तर यवतमाळ व वणी येथील उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे.
हा पराभव बोदकुरवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. आज ता. १ डिसेंबर रोजी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चक्क भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे नाव घेवून माझ्या पराभवाला कारणीभूत ठरवले आहे. व प्रचार कार्यालयात त्यांनी मारहाण केल्याची कबुली दिली आहे. व ही मारहाण झाली नसती तर माझा पराभव झाला नसता असे बोलले आहे.
यामुळे राजकीय स्वार्थ भोगण्यासाठी माजी आ. बोदकुरवार हे किती खालची पातळी गाठू शकते याची प्रचिती कुणबी समाजासमोर आणखी एकदा आली आहे. बोदकुरवार यांनी निवडणूक संपन्न होण्याअगोदर बोर्डे यांनी मारहाण केलीच नाही ही भूमिका घेवून समाजाची दिशा भूल केली आहे. तर आता त्यांनी मारहाण केली म्हणून कबुली दिली आहे.
याचा अर्थ असा निघतो की कुणबी समाजाबद्दल जे आक्षेपार्थ वक्त्यव करण्यात आले होते ते खरे आहे. ते लपविण्याचे पाप भाजप व बोदकुरवार यांनी केले आहे. या घटनेत आरोपी असलेला सुधीर साळी यांचेवर दोषारोपण करण्यासाठी व त्याला न्यायालयीन दंडित करण्यासाठी माजी आ. बोदकुरवार यांनी घेतलेल्या दोन्ही पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पुरावा म्हणून कामी पडणार आहे. व त्यांची देखीलसह आरोपी म्हणून कसून चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत पोलीस प्रशासन व कुणबी समाज काय निर्णय घेतली याकडे लक्ष लागले आहे.
बघा व्हिडिओ माजी आ. बोदकुरवार म्हणत आहे.
https://youtu.be/Lin0Z5IS83M?si=45wmjOTySjHnLvTE
माजी आ. बोदकुरवार यांचेकडून कुणबी नेतृत्वाला बदनाम करण्याचे षडयंत्र तर नाही ना?
पराभव स्वीकारल्या नंतर माजी आ. बोदकुरवार यांनी ज्या पद्धतीने भाजपचेच जिल्हाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांचेवर खापर फोडायला सुरवात केली आहे. त्यामुळे भाजपातील दोघांचा वाद आता प्रचंड विकोपाला गेला आहे. बोदकुरवाराना कुणबी नेतृत्व नकोस वाटू लागले आहे. असे जनतेच्या निदर्शनास येत आहे. वणी विधानसभेत सर्वाधिक मतदार हे कुणबी समाजाचे असून भाजपाने लोकसभा व विधानसभेत कुणबी ओबीसी उमेदवार न दिल्याने त्यांची किंमत चुकवली आहे. आणि आता जर कुणबी नेत्यांना वादाच्या भोऱ्यात टाकून नेतृत्व संपविण्याचा घाट तर रचला जात नाही ना अशी शंका निर्माण होत आहे. असे घडल्यास येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीतही भाजच्या हातात भोपळा आल्या शिवाय राहणार नाही.
चार दिवससा आदी त्या आरोपीने घेतली बोदकुरवारांची भेट
कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी करणाऱ्या त्या आरोपीला भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. परंतु त्या आरोपीने चार दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात माजी आमदार बोदकुरवार यांची गुप्तपणे भेट घेतल्याची माहिती आहे. त्या आरोपीचे वाहन बोदकुरवार यांचे घरासमोर उभे असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व प्रत्यक्ष दर्शिनी त्या आरोपीला स्वतःचे चारचाकी वाहन उभे करून घरात जातांनी बघितले आहे. जेव्हाकी हकालपट्टी झाल्यानंतरही तो बोदकुरवार यांचे संपर्कात का आहे. असा प्रश्न निर्माण झाले. व यांच्यात अजूनही गुप्तपणे हालचाली घडल्यानंतर तारेंद्र बोर्डे यांचेवर खुलेआम पराजयाचे खापर फोडून बोदकुरवार हे आगपाखड करीत आहे. त्यांना कुणबी नेतृत्व नको आहे का? की त्यांना जिल्हाध्यक्षपदाचे आता डोहाळे तर लागले नाही ना अश्या अनेक चर्चेला ऊत येत आहे.
बघा त्यांच्या काल तारीख १ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील बातमीची लिंक
https://wanibahuguni.com/waninews/bodkurwar-press-conference-wani/
बोदकुरवारांकडून कूणबी समाज अशिक्षित समाज असल्याचा उल्लेख,आणखी रोष वाढण्याची शक्यता