News Today
वणी :- कायर येथील विवेकानंद विद्यालयात 26 नोव्हेंबर हा दिवस” संविधान दिवस” म्हणून साजरा करण्यात आला.
शासनाचे परिपत्रकान्वये 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2024 पर्यंत या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करनेचे दृष्टीने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय सनविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे.
आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ अध्यापक मधुकर घोडमारे , सहायक शिक्षिका सोनाली भोयर, सहायक शिक्षक रविकांत गोंडलावार उपस्थित होते.
याप्रसंगी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर घोडमारे यांनी केले. तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी कु प्रणाली ताजने, आयशापठाण, साजिया शेख, मीनाक्षी उपरे, श्रुती बोरूले यांनी भारतीय संविधानावर आधारित स्लोग्न तसेच तिन्ही भाषांमध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले व संविधानाचे महत्व मनोगतातून व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणातून सुरेंद्र इखारे म्हणाले की संविधानाचे महत्व अनेक स्तरावर असून हे संविधान देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत गोंडलावार यांनी केले तर आभार सोनाली भोयर यांनी मानले . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळांनायक मयूर खुटेमाटे, क्रीडांनायक रोहन मडावी, प्रयोगशाळा परिचर मधुकर कोडापे, शिपाई दिलीप कानंदस्वार, आकाश बोरूले यांनी सहकार्य केले.