शिरपूर येथे प्रचार रॅली दरम्यान नागरिकांनी आमदाराला अडविले
News Today
वणी :- मागील २५ ते ३० वर्षातील इतिहासामध्ये येवढा अपमान कोणत्याही आमदाराचा झाला नाही तेवढा अपमान गावोगावी भाजप आमदार बोदकुरवार याचा या निवडणुकीत होताना दिसून येत आहे. एका तरुणांनी रोजगार संदर्भात विचारताच त्याला उडवाउडवीची उत्तरे देवून भाजप जिंदाबाद म्हणून बोदकुरवार यांनी आपला पाय काढला. हा प्रकार तालुक्यातील शिरपूर येथे घडला आहे. याबाबत व्हिडिओ देखील उलब्ध झाला आहे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत अडलेल्या विधानसभेतील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू असून उमेदवारांच्या रॅल्या, पदयात्रा, कोपरा सभा गावागावात होत आहे. यातील सर्वांच्या चर्चेला विषय म्हणजे विद्यमान सत्तेतील आ. बोदकुरवार यांचा होत आहे.
तारीख ४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रकरणी एका समाजाबद्दल अभद्र टिपणी एका भाजप पदाधिकाऱ्यांनी करताच त्या ठिकाणी जोरदार मारहाण झाली. ही घटना आ. बोदकुरवार यांचेसाठी अशुभ ठरली आणि तेव्हापासून त्यांचे मागे साडेसाती लागल्याची मतदारांत चर्चा आहे.
विधानसभेत ज्या ज्या गावात आ. बोदकुरवार व त्यांच्या प्रचाराचे वाहन जात आहे. तेथील मतदार, बेरोजगार तरुण, गोर गरिब महिला त्यांचेवर प्रश्नाचा. भडिमार करीत आहे. त्यामुळे भाजपच्या प्रचार मंडळींची उत्तरे देता देता बोलती बंद होत आहे. त्यामुळे यांनी केलेल्या विकासाची प्रचिती सर्वांना दिसून येत आहे.
आज सकाळी शिरपूर येथे भाजपची प्रचार रॅलीत सुरू असताना काही शेतकरी, बेरोजगार तरुण एकत्रित येवून सरळ सरळ आमदार महोदयांची रॅली थांबवून विकासाबाबतच्या प्रश्नांचा भडीमार करीत आहे. यात शेतीच्या शेतमालाला भाव, महागाई, व बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे यावर कोणतेही समाधान कारक उत्तर या सत्ताधारी आमदाराकडे दिसून येतं नाही. यामुळे आमदार बोदकुरवार यांचे चेहऱ्यावर पराभवाचे नैराश्य दिसून येत आहे. त्यांच्यात चिडचीडपणा निर्मान झाल्या सारखे त्या व्हिडिओत दिसून येत आहे.
शिरपूर येथे घडलेल्या या प्रकारात बेरोजगार तरुणाने विचारलेल्या प्रश्नाचे समाधान कारक उत्तर न देता भाजप जिंदाबाद म्हणून दिलेल्या सल्याने बेरोजगार तरुणांमध्ये रोष निर्माण झाला आहे. या रोषाला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर हे कॅश करीत आहे. भाजपचे आमदार बोदकुरवार यांनी आपल्या कार्यकर्त्यावरीलं खर्चाचे हात आवरते घेतल्याची माहिती आहे.
हा बेरोजगार तरुणांच्या भावनेचा अपमान – संजय देरकर
स्थानिक उद्योग व प्रकल्पामध्ये ८० % रोजगाराचा वाटा हा स्थानिक बेरोजगार तरुणांचा असताना या ठिकाणी बाहेरील राज्यातील भाजपच्या तरुणांना रोजगार दिल्या जात आहे. व एक लोकप्रतिनिधी म्हणून बेरोजगारांच्या रोजगाराची व्यवस्था लावणे हे त्यांची जबाबदारी आहे. आणि बेरोजगाराने आपल्या हक्काच्या रोजगारावर प्रश्न विचारला असता त्याला भाजप जिंदाबाद म्हणून आमदार उत्तर देत असेल तर ते तमाम बेरोजगार तरुणांनाच्या भावनेचा घोर अपमान आहे. तसेच गोरगरीब महिलेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे देखील बंधनकारक असताना त्यांनी तिथून पळ काढणे हा त्यांचा पळकुटेपणा बाहेर आला आहे. आणि मतदार त्यांना यावेळी चांगलाच धडा शिकवणार आहे मत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांनी आ. बोदकुरवार यांचे नाव न घेता न्युज टुडे जवळ बोलताना टोला लावला आहे.