मविआ च्या संजय देरकरांच्या प्रचारार्थ रेकॉर्ड ब्रेक गर्दी
News Today
दिलीप भोयर
वणी:- येथील शासकीय मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकरांच्या निवडणूक प्रचारार्थ संपन्न झालेल्या विराट सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहून विरोधकांची धांदल उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी डागलेल्या तोफेने भारतीय जनता पार्टी व त्यांचे उमेदवार आ. बोदकुरवार यांच्या कानाचे पडदे फाटल्याची चर्चा असून उद्धव ठाकरेंच्या गर्जनेने भाजपच्या कानठळ्या बसल्या आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ ची निवडणूक येत्या २० नोव्हेंबर रोजी संपन्न होत असून वणी विधानसभेतील महाविकास आघाडीची जोरदार हवा तैयार झाली आहे. वणी विधानसभेत शिवसेना ऊबाठा गटाचे संजय देरकर हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवीत आहे. शिवसेना ( ऊबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचार सभेचे आज तारीख ११ रोजी दुपारी शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ आयोजन करण्यात आले होते.
या सभेला खा. अरविंद सावंत, खा. प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, दिलीप भोयर, अजय धोबे. राजीव कासावार, प्रकाश मॅकलवार, प्रा. टिकाराम कोंगरे, संजय निखाडे संध्या बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे आपल्या मनोगतात असे म्हणाले की, भाजप सरकारच्या पुढाऱ्यांजवळ शेतकऱ्यांना सांगण्यासाठी कोणतेच मुद्दे उरले नाही. केवळ ३७० हटविल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळणार शेतकरी देशोधडीला लावून देशाचा विकास होणार त्यासाठी शेतीचे विकसित धोरण प्रामुख्याने राबविणे गरजेचे आहे. आणि ज्यांनी कुणबी समजाबद्दल जे वक्तव्य केले ते अत्यंत घृणास्पद आहे असे संबोधीले.
याच बरोबर लोकसभेतील निवडणुकीत बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासली होती तो मंत्री अजूनही भाजपवाल्यानी सरकार मध्ये ठेवला आहे. यावरून यांची नैतिकता उभ्या महाराष्ट्राला दिसून आली आहे आणि आज कुणबी समाजाबद्दल अभद्र टीपणी करून महाराष्ट्रातील वाघांना डिवचले आहे. त्यामुळे छाताडावर बसून मशाल पेटवायची आहे.
तसेच अन्य मतदारसंघातील जिव्हाळ्याचे अनेक मुद्दे आपल्या गर्जनेतून मांडताच भाजपकडे शेती विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने भाजप व आ. बोदकुरवार यांची चांगलीच गोची यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. रेकॉर्ड ब्रेक गर्दीच्या सभेला संबोधित करून ठाकरे यांनी भाजपच्या कानठळीत हाणली. यासभेचे सूत्रसंचालन समीर लेनगुळे यांनी केले. तर आभार प्रवीण खानझोडे यांनी मानले.
उमेदवारांची ओळख नसल्याने घडला तो प्रकार :- संजय निखाडे
वणी येथील प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांच्या सभे दरम्यान वरोरा भद्रावतीचे उमेदवार प्रवीण काकडे हे स्टेजवर ठाकरे यांचे सोबत अभिवादन करताना जात असताना शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी त्यांना अडवले होते. हा प्रकार केवळ उमेदवार काकडे यांची ओळख नसल्याने त्यांना अडविण्यात आल्याची माहिती शिवसेना कडून देण्यात आली आहे. त्यामुळे याचा अपप्रचार कोणी करू नये असे आवाहन उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी केले आहे .