News Today
दिलीप भोयर
वणी :- तेथील विधानसभेत काँग्रेस नेत्यांच्या बंडखोरीत दररोज वाढ होत आहे..परंतु त्यांचेवर कोणतीच कारवाई का होत नाही त्यांची पाठराखण करतो तरी कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महा युती विरुद्ध महा विकास आघाडी अशी सरळ लढत संपूर्ण राज्यात लावण्यात आली आहे. महायुती मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) व इतर पक्ष विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबठा गट) राष्ट्रवादी (श.प.गट व इतर पक्ष अशी लढत निवडणुकीच्या मैदानात रंग भरत आहे. असे असताना वणी विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडी कडून शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार म्हणून संजय देरकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
त्यांना महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे समर्थन लाभत आहे. परंतु काँग्रेस पार्टीचा स्वयंघोषित रखवाला संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली व त्यांचे सोबत त्यांचे भलावण करणारे काही काँग्रेसचे पदाधिकारी आम्हाला दिवंगत खा. बालुभाऊ धानोरकर व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचा आशीर्वाद लाभला आहे.
तसेच मला काँग्रेसचा पंजा या विधानसभा क्षेत्रात वाचवायचा असून माझ्यावर महा विकास आघाडीने केलेल्या अन्यायाचा प्रतिरोध करणे हाच हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून नागरिकांची दिशा भूल करीत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उच्चपदस्त पदाधिकारी ह्या सर्व प्रकाराकडे डोळे झालं का करीत आहे. अशी जनसामान्य चर्चा रंगत आहे.
तसेच काँग्रेस पक्षातील निष्ठावान कार्यकर्ते हे महविकास आघाडी सोबत दिसून येत आहे. परंतु कही लोभी स्वार्थी राजकीय पुढारी मात्र उठसूट अपक्ष बंडखोर उमेदवार संजय खाडे यांच्या तंबूत जावून आपके समर्थन देत आहे. मग या काँग्रेस पक्षाच्या धोरणा विरुद्ध वागणाऱ्यांना कुणाचा आर्शिवाद मिळत आहे. असा प्रश्न मतदारांमध्ये उपस्थित झाला आहे.
तसेच बंडखोरी करून देखील यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी का केली जात नाही अशी विचारणा मतददारांनमधून विचारणा होत असतानाच बंडखोर उमेदवार संजय खाडे यांना पाठिंबा दर्शविणारे शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे विरुद्ध पक्षश्रेष्ठींनी एका रात्री कार्यवाही केली. परंतु काँग्रेसला या बंडखोरांवर कारवाई करण्यासाठी मुहूर्त कधी गवसणार अशी चर्चा होत आहे.