News Today
प्रतिनिधी
वणी :- येथील सत्य व परखड लिखाण करून जनमानसात सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट्राचार उघड पाडणारे एकमेव न्युज पोर्टल म्हंजे वणी न्युज टुडे आहे. या पोर्टलवर मानहानी दाखल करू म्हणून पत्रपरिषदेत धमकी देणारे सत्तेतील प्रस्तापित लोकांनी मानहानी दाखल करावी आम्ही त्यांच्या पाठीमागे समाजातील शेकडो वकील आपले वकील पत्र घेवून उभे करू घाबरण्याचे कोणतेही काम नाही. असे आश्वासन येथील नामांकित विधीतज्ञ ऍड. विप्लव तेलतुंबडे यांनी वणी न्युज टुडे चे संपादक दिलीप भोयर यांची भेट घेवून दिले आहे. ऍड. तेलतुंबडे यांच्या या भूमिकेमुळे समाजातील असंख्य वकिलांची संवेदना जागृत झाल्या आहे. अनेक वकील देखील मदतीला धावणार असल्याचे सांगितले.
नुकतेच ४ दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाच्या प्रचार कार्यालयात एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्थ भाष्य करण्यात आल्याने त्या स्वपक्षीयातील एका पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्थ विधान करणाऱ्या पदाधिकर्याला चांगलाच चोप दिला ही बातमी संपूर्ण शहरात त्याच रात्री पसरली होती. दुसऱ्या दिवशी पत्रकार दिलीप भोयर यांनी या घटनेची शहानिशा करून त्यांचे पोर्टलवर मुद्देसुत प्रकाशित केली. त्यात कोणतीही कुणाचीही मानहानी होईल असे काहीही मजकूर नाही. परंतु त्या वृत्ताने प्रस्तापित राजकारण्यांची भूमिका व त्यांचे कृत्य बाहेर आल्याने त्यांची चांगलीच दमझाक झाली आहे. त्या दिवशीचा संबंधित राजकीय पार्टी प्रचार कार्यालयातील घटनाक्रम आणि सर्वांचे तांत्रिक अहवाल देखील तपासण्याची गरज आहे.
त्या ठिकाणी कुणबी समाजाबदल आक्षेपार्थ विधान झाले नसते तर मारहाण झाली नसती व मारहाण झाली नसती तर त्यांच्या डोक्याला टाके पडले नसते. त्याच बरोबर त्याने उपचार केला नसता व त्यांचेवर समाजाने पोलीसात गुन्हा नोंद केला नसता. ह्या सर्व बाबी लक्षात घेतल्या तर हेच सिद्ध होते की त्या ठिकाणी आक्षेपार्थ भाष्य केले आहे.
म्हणून प्रस्थापितांना प्रत्र परिषद घेवून खुलासा द्यावा लागला व त्यांनी देखील कबूल केले आहे. तसे व्हिडिओ समाज माध्यमामध्ये प्रसारित झाले आहे. तसेच हा प्रकार घडला परंतु तो प्रकार तसा नाही असे असेल तर त्यास आरोपीची व माहरण करणाऱ्या पाधिकर्यांची तेथे उपस्थित असलेल्या लोकप्रतिनिधींची शासनाच्या संबंधित यंत्रणेने नार्को चाचणी करावी किंव्हा या प्रस्तापित लोकांनी स्वतःची नार्को चाचणी करून जनतेला ते वृत्त खोटे आहे याचे पुरावे सादर करावे. केवळ सत्य बातम्या प्रकाशित होवू नये यासाठी या लोकांनी अश्या कोरड्या धमक्या देवू नये. आणि मुजोरी करून तशी मानहानी दाखल केली तरी ती कायद्या समोर आणि अभीव्यक्ती स्वातंत्र्या समोर टिकणार नाही.
असे असताना देखील त्यांनी मानहानी दाखल केली तर त्यांच्या पाठीमागे समाजातील शेकडो वकील आपले वकील पत्र घेवून न्युज टुडे पोर्टल व त्यांचे संपादक दिलीप भोयर यांचे पाठीमागे उभे होतील याची आम्हाला गॅरंटी आहे. त्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सत्य लिहायचा अधिकार लोकशाहीच्या ४ थ्या आधार स्तंभाला आहे. त्यांच्या सौरक्षणासाठी कायदेशीर तरतूद आहे. अशी माहिती ऍड. विप्लव तेलतुंबडे यांनी न्युज टुडे पोर्टलचे संपादक दिलीप भोयर याणा दिली आहे. तसेच सत्य आणि परखड लिखाण करून समाजाला जागृत करणाऱ्या पत्रकारांची अत्यंत गरज असल्याचे सांगितले.